Skip to content Skip to sidebar Skip to footer

Author page: Admin

मने अजून गढूळ का? ©️

श्री समर्थ मालिक – प्रवचन - परांचे वचन, त्यांचे बोल ! ते ऐकण्याची इच्छा म्हणा. सेवेकऱ्यांची महान इच्छा असते प्रवचन ऐकण्याची, पण त्याप्रमाणे कोणी सेवेकरी चालले आहेत का? आदेश मानले आहेत का? मनात रुजू करून घेतले आहेत का? सत् हे कोणाकडून काय करून घेईल हे सांगता येणार नाही. मग तुम्हाला सांगून ते करून घेईल…

Read More

ॐ कार साधना ९

ओमचे उच्चारण करताना आपण ते कोणत्याही स्थितीत बसून करु शकता. परंतु विशेषकरून जमिनीवर बसून पद्मासन वा सुखासन घालून बसून करणे यथायोग्य होईल. अशाप्रकारे बैठक साधल्यानंतर, डोळे मिटून घ्या व शांतपणे आपले लक्ष दोन भुवयांच्या मध्ये एकवटून दीर्घ श्वास घ्या आणि पोटातूनच अ चे उच्चारण करता करता छातीजवळील भागात आल्यावर तोंडाचा चंबूसारखा (गोल) आकार करून ओ…

Read More

ॐ कार साधना ८

ॐ कार उच्चारण पध्दती – ध्वनी प्रक्रियेचे चार टप्पे – ओम चा उच्चार विशेषत्वाने चार प्रकारे केला जातो. जसे, (अ) वैखरी (ब) मध्यमा (क) पश्यंती (ड) परा हे ध्वनी प्रक्रियेचे चार टप्पे होत. (अ) वैखरी – यामध्ये मोठ्याने उच्चारण करणे असते. त्यामुळे साधकाचे मन आवाजावर एकाग्र होण्यास मदत होते. मनाला…

Read More

ॐ कार साधना ७

ॐ कारांचे प्रगटीकरण व सृष्टीची निर्मिती – ॐ च्या उच्चारणात तीन अक्षरे सामावलेली आहेत. ती म्हणजे अ-ऊ-म होय. ही तीन अक्षरे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे प्रतिनिधित्व करतात. जसे, अ हे अक्षर ब्रह्म, ऊ हे विष्णू व म हे महेश अर्थात शंकर यांचे प्रतिक होय असे म्हटले जाते. यांना…

Read More

ॐ कार साधना ६ ©️

दिनांक:१४. १०. ७५ च्या प्रवचनातून श्री समर्थ मालिक सांगताहेत, “ज्यावेळी या पृथ्वीवर काहीही नव्हते, मग हे उत्पन्न झाले कसे? कोणी केले? याचा कर्ता कोण ? मानवाचे जगताच्या पृष्ठभागावर अस्तित्व असावे म्हणून हे केले. मी जगात वावरतो याचा उहापोह कोणी केला असता? एकच तत्व सर्व ठिकाणी व्यापक आहे. ओंकार बीज कसे निर्माण झाले कोणी फेकले याची…

Read More

ॐ कार साधना ५ ©️

दिनांक: १४. १०. ७५ च्या आपल्या एकचित्ततेत सांगताना जगन्माता म्हणते, “अदृष्याला कोणी पाहिले आहे का? अदृष्याला मालकांच्या कृपेने पाहता येते. तेही आकारीच रूप आहे. आकारी स्वरुपीच वाटचाल करायला सांगते. मग अदृष्याची गती आणि त्यांचे ठिकाण मिळते व ओळख होते. आम्ही जरी महान असलो तरी उत्पत्ती करणारे तेच आहेत. माझ्याही अंत:र्यामी तेच आहेत. त्यांना विसरून…

Read More

ॐ कार साधना ४ ©️

ओंकार हे बीजच नसते तर काही पाहता आले नसते. म्हणूनच ही जी मां आहे हे सतच आहे. तुमचे सद्गुरु बाबा जे आहेत, ते ओंकार स्वरूपीच आहेत, अन ओंकार हीच महामाया आहे. ही माया सर्व ठिकाणी विखुरली आहे. ते एकच तत्व आहे. ते तत्त्व नसते, तर आकार निर्माण झाला असता का? ते अनेक तऱ्हेने वावरू…

Read More

ओंकार साधना ३ ©️

श्री विठ्ठल – आपल्या दिनांक: २२ जुलै १९७२ च्या प्रवचनातून सांगतात, “एक (१) म्हणजेच आकार ! तोच ॐ कार ! म्हणजे एकातच एक मिलन झाल्यानंतर मग सर्व एकच ! शेवटी तो ही एकलय होतो. मग निर्गुण निराकार ! त्यांनी अनंत तत्वे या पृथ्वीतलावर फेकली आहेत. त्यांच्याकडून ते कार्य करून घेतात. म्हणून प्रत्येक सेवेकऱ्याने आपले कर्तव्य…

Read More

ॐ कार साधना २

ओंकार साधना ही फार प्राचीन काळापासून चालत असलेली विश्व स्पंदनांना आपल्या शरीराभोवती कार्यरत करायला उद्युक्त करणारी अशी एक साधना - चिकित्सा पद्धती आहे. ओंकार म्हणजेच प्रणव अर्थात हा विश्वनिर्मिती नंतरचा पहिला ध्वनी आहे असा विश्वास आहे. ओंकार साधना याचा अर्थ ओमकाराच्या उच्चारातून, ओमकाराच्या आवर्तनांमधून आरोग्याचे आणि पंचकोषांचे संतुलन असा आहे. ओंकार साधना अत्यंत…

Read More

ॐ कार साधना –

ॐ कार साधना – अत्यंत गुणकारी, साधी, सोपी, बिनखर्चाची चिकित्सा पद्धती... व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हटले जाते. आरोग्य रक्षणासाठी असलेली अ‍ॅलोपॅथी ही आधुनिक चिकित्सा पद्धती ही एकच चिकित्सा पद्धती नाही, तर प्राचीन काळापासून भारतामध्ये विविध प्रकारच्या चिकित्सा पद्धती प्रचलित होत्या, त्यामध्ये आयुर्वेद, सिद्धऔषधी, योग, प्राणायाम, चुंबक चिकित्सा इ. अनेक प्रकारच्या पॅथी म्हणजेच पद्धती होत्या.…

Read More

जगाची निर्मिती ©️

श्री समर्थ मालिक - प्रथम चैतन्य आकार बिंदू, त्यापासून धुनधुनकार ! धुंधुंकारापासून ओंकार, नंतर हा जगताचा पसारा झाला. ओंकाराची निर्मिती झाल्याशिवाय जगाची निर्मिती नाही. धुंधुंकारापासून ओंकार अन ओंकाराचे पोटी महामाया. महामायेपासून त्रिगुण निर्माण झाले. नंतर सृष्टीची उत्पत्ती झाली. मग ओंकार हे तत्व नसते, तर तुम्ही कोणाला पाहिले असते, म्हणूनच तिला महामाया म्हटलेले आहे. मग…

Read More

प्रार्थना (३) ©️

सेवेकऱ्यांची भावना उच्च दर्जाची आहे हे मी जाणतो. पण कोणतेही कर्तव्य योगायोगाने होते. संचिताप्रमाणे कोणतीही वस्तू मिळते. भावना असते, मी एकदम, सद्गुरु सानिध्याने आणखीन विवेचन करीन. काहीतरी चमत्कार दाखवीन असे सुद्धा वाटते. सत् कर्तव्य परायनतेणे जे कष्ट केलेले असतात, त्या सत् कर्तव्याचे फळ सेवेकऱ्याला अवश्य मिळते. पण केव्हा आणि कधी? हा प्रश्न आहे. पण तेच…

Read More

You cannot copy content of this page