Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

ओंकार साधना ३ ©️

ओंकार साधना ३ ©️

श्री विठ्ठल – आपल्या दिनांक: २२ जुलै १९७२ च्या प्रवचनातून सांगतात, “एक (१) म्हणजेच आकार ! तोच ॐ कार ! म्हणजे एकातच एक मिलन झाल्यानंतर मग सर्व एकच ! शेवटी तो ही एकलय होतो. मग निर्गुण निराकार ! त्यांनी अनंत तत्वे या पृथ्वीतलावर फेकली आहेत. त्यांच्याकडून ते कार्य करून घेतात. म्हणून प्रत्येक सेवेकऱ्याने आपले कर्तव्य काय? आपण कोण, कोणत्या ठिकाणी शरण आहोत? हे ओळखून कृतीमान होण्याचा प्रयत्न करणे.”

दिनांक:१०. १०. ७५ च्या आपल्या प्रवचनात श्री समर्थ मालिक म्हणतात, “प्रथम चैतन्य आकार – बिंदू, त्यापासून धुनधुनकार ! धुंधुंकारापासून ओंकार, नंतर हा जगताचा पसारा झाला. ओंकाराची निर्मिती झाल्याशिवाय जगाची निर्मिती झाली नाही. धुंधुंकारापासून ओंकार अन ओंकारांचे पोटी महामाया. महामायेपासून त्रिगुण निर्माण झाले. नंतर सृष्टीची उत्पत्ती झाली. मग ओंकार हे तत्व नसते, तर तुम्ही कोणाला पाहिले असते, म्हणूनच तिला महामाया म्हटलेले आहे. मग तुम्ही सत माया म्हणा, अगर काहीही म्हणा !

You cannot copy content of this page