Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूंबद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व दिसणार …

मी कुठे प्रगट होईन, कुठे नाही…©️

मी कुठे प्रगट होईन, कुठे नाही…©️

श्री समर्थ मालिक – सद्गुरु चरण ज्यांना कळले आहे, त्यानांच कळले आहेत. असेही काही मानव म्हणतात कि हि गुरुगीता स्वयंभूनेच लिहिली आहे का? म्हणूनच एका संताने गीता लिहिली आहे. त्याने अनुभव सिद्धतेनेच लिहिले आहे. जशी ज्याची कर्मगती, तशी ती त्याच्या डोक्यात बसेल. म्हणून सांगितलेले सत्य आहे.

मी आहे, त्याला आहे ! नाही त्याला नाही ! म्हणूनच कृष्णावतारात उलटे सुलटे खेळ खेळावे लागले. दोन्ही पक्षाच्या हृदयात मीच होतो. पण बुद्धी भ्रम झाल्यानंतर, दृष्टांचा क्षय करण्याचा प्रयत्न होतो. मग कोण कोणाला मारतो? मी जरी त्यांच्या हृदयी असलो, मग माझा मीच मृत झालो असे म्हणावे काय?

अहंकाराने बरबटलेला हा आकार अघोर मार्गी जातो. त्यात भीष्म तल्लीन झाले होते. पण भीष्माला, द्रोणाचार्याला धीर देऊन हे कर्तव्य झाले आहेच नां? म्हणून अखंड सत् – त्यांच्या चरणात जो निमग्न आहे, मग तो भले जरी मायावीत असला, तरी तो काही वेळ सद्गुरु चरणांची आठवण करतो. त्यामुळे त्याच्यासाठी काहीतरी करावे लागते. तेव्हा सेवेकऱ्यांनी संशय रहित होण्याचा प्रयत्न करा.

मी आकाराच्या रहित नाही, माझा अंत कोणीही घेऊ शकत नाही. मी कुठे प्रगट होईन, कुठे नाही हे कोणासही कळणार नाही. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page