Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – प्रारब्धाप्रमाणे,पूर्व संचितानुसार त्यांनी आम्हाला आपल्या सानिध्यात घेतले आहे, अशा त्या माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी हे मना …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – शरीर मन सोडून नाही आणि मन शरीर सोडून नाही. शरीराला त्रास झाला तर मनाला त्रास …

“तुरत दान महापुण्यम” नाही. पुढे ही ज्योत कुठे जाणार आहे याची सर्वस्वी नोंद त्यांच्याजवळ असते. सद्गुरूंना सर्वस्वाची कल्पना असते. अन हाच राजमार्ग …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – आपणाला माहित आहे कित्येक कोटी अघोरांचा नाश झाला. शुद्धीकरणात ज्योतींचे तुकडे करून नाश केला. त्या …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

हे मना…३ ©️

हे मना…३ ©️

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. ते जाणणे कठीण, तुकाराम महाराज म्हणतात ना, तेथे पाहिजे जातीचे। येऱ्या गबाळ्याचे काम नोहे ।। पण जो भक्त, जो सेवेकरी हे साधू शकेल ज्याचे मन सद्गुरुंबद्दलच्या भावनेने ओथंबलेले असेल तोच हे जाणू शकेल.

काही भक्त आपल्यावर प्रसंग आला की धावत येतात. इतर वेळी टंगळमंगळ करतात. अशी जर भक्ती असेल, भावना असेल तर हृदयस्थ विराजमान असलेल्या सद्गुरूंनी तरी काय करावे? प्रवचन करत असताना थोडे बहुत टोकले हे पाहिजेच. परंतु सद्गुरु माऊली दयाघन आहे ते त्यातूनही भक्ताला मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतात.

सद्गुरु कसे आहेत तर अति विशाल, अति शांत, अति कोमल! भगवद गीतेत कृष्णांनी अर्जुनाला सांगितले, नाचतो मी तेथे भावो। ना भावो विद्यते सता ।। आहे ते सत आहे, सदभावनेने पाहता आले तर ते आहे. सदभावना नसेल तर पाहता येणार नाही. ज्योत जर सताबद्दल सद्गुरुंबद्दल सदभावनेने ओथंबलेली असेल तर तिला सत पाहता येईल अन्यथा नाही. त्या सेवेकऱ्याला, त्या ज्योतीला दाखवितात पहा मी कसा आहे? नूसत्या मायाब्रम्हात गुरफटलेला असेल तर त्या सेवेकर्‍याला त्यांचे रूप पाहता येणार नाही, अनुभव घेता येणार नाही. हे मना माझ्या हृदयस्थ जे सत, जे सद्गुरु विराजमान झालेले आहेत, त्यांना शरण जा. सर्वस्व त्यांना अर्पण करून ते कसे आहेत हे पाहण्याचा प्रयत्न कर. हे मना त्या सताची शक्ती अमर्याद आहे, ते क्षणात त्रिगुणांनाही लय करू शकतात तेथे तुम्हा आम्हा मानवांचा काय पाड लागणार? आपल्या सद्गुरूंना, आपल्या बाबांना जर सेवेकर्‍यांनी ओळखले आणि जर त्यांनी सहज जरी प्रश्न विचारले तर सत शुद्ध भावनेने उत्तर देता आले पाहिजे, हेतू रहित, आत बाहेर काही न करता सांगता आले पाहिजे. उत्तर हेतू रहित दिले पाहिजे. ज्यावेळी एखाद्या सेवेकर्‍यावर प्रसंग येतो, त्यावेळी त्याचे माया ब्रह्म त्याच्या उपयोगी येते का?…©️

You cannot copy content of this page