Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – प्रारब्धाप्रमाणे,पूर्व संचितानुसार त्यांनी आम्हाला आपल्या सानिध्यात घेतले आहे, अशा त्या माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी हे मना …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – शरीर मन सोडून नाही आणि मन शरीर सोडून नाही. शरीराला त्रास झाला तर मनाला त्रास …

“तुरत दान महापुण्यम” नाही. पुढे ही ज्योत कुठे जाणार आहे याची सर्वस्वी नोंद त्यांच्याजवळ असते. सद्गुरूंना सर्वस्वाची कल्पना असते. अन हाच राजमार्ग …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – आपणाला माहित आहे कित्येक कोटी अघोरांचा नाश झाला. शुद्धीकरणात ज्योतींचे तुकडे करून नाश केला. त्या …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – ही भक्ती इतकी अत्यंत श्रेष्ठ आहे की त्याची योग्यता ऋद्धी-सिद्धी, तंत्र-मंत्र, याबरोबर तुम्ही करू शकत …

मना सज्जना भक्ती पंथेची जावे। ©️

मना सज्जना भक्ती पंथेची जावे। ©️

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज –

आकार आणि निराकार यात कोणताही फरक नाही. आकारही तेच आणि निराकारही तेच! पण लक्षात ठेवा हे कधी ओळखता येईल, ज्यावेळी आपले मन सदभावनेने ओथंबलेले असेल तर. आकार आणि निराकार हे केवळ मनाजवळ आहेत. आम्हाला देखील या कलियुगामध्ये असे संदेश आहेत की मनाची छाननी करा. मनाचा कस आहे परंतु सत, द्वापार, त्रेता युगासारखा कस नाही. मनाने तो किती ठाम आहे हाच कस आहे. कोणीही तुमच्यापैकी असा सेवेकरी आहे का की जो हे सांगू शकेल की बाबा आमचा कस घेऊन मोकळे झाले. परंतु जो जाणकार आहे तो यातले मर्म जाणतो, म्हणून म्हटले आहे, जागेल तो जगेल, सावध तो सुखी !

सद्गुरु तत्त्वच असे आहे, त्याचा थांग कोणालाही लागणार नाही. सेवेकर्‍यांनी हे मनोमन ठरवले पाहिजे की मला यातले मर्म जाणायचे आहे. ज्यांचा मी सेवेकरी आहे, ज्यांच्या चरणावर मी लीन आहे ते कोण आहेत, तर त्रिगुणांच्या कारभारावर त्यांची देखरेख आहे. पण ते माझ्या ठिकाणी कसे वास करीत आहेत हे मला जाणले पाहिजे. रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकात काय सांगितले आहे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे ! ©️

You cannot copy content of this page