Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

“तुरत दान महापुण्यम” नाही. पुढे ही ज्योत कुठे जाणार आहे याची सर्वस्वी नोंद त्यांच्याजवळ असते. सद्गुरूंना सर्वस्वाची कल्पना असते. अन हाच राजमार्ग …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – आपणाला माहित आहे कित्येक कोटी अघोरांचा नाश झाला. शुद्धीकरणात ज्योतींचे तुकडे करून नाश केला. त्या …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – ही भक्ती इतकी अत्यंत श्रेष्ठ आहे की त्याची योग्यता ऋद्धी-सिद्धी, तंत्र-मंत्र, याबरोबर तुम्ही करू शकत …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – आपण पाहतोच की आपल्याकडे काही मानवांची शुद्धीकरण स्थिती होत असताना काही बलाढ्य तर काही महाबलाढ्य, …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – भक्ती हा एक मोठा राजमार्ग आहे त्यात काटे कुटे, खाच खळगे काही नाही. परंतु तामसी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

भक्तीनेच प्रगती, अन्यथा अधोगती ©️

भक्तीनेच प्रगती, अन्यथा अधोगती ©️

“तुरत दान महापुण्यम” नाही. पुढे ही ज्योत कुठे जाणार आहे याची सर्वस्वी नोंद त्यांच्याजवळ असते. सद्गुरूंना सर्वस्वाची कल्पना असते. अन हाच राजमार्ग सेवेकरी चुकला तर मग सेवेकऱ्याची कशी प्रगती होईल, म्हणून सद्गुरु मार्गदर्शन करीत असतात. भक्तीनेच सेवेकरी पुढे जाऊ शकेल, स्वतःची प्रगती साधू शकेल. तपश्चर्येने हे साध्य होणार नाही, मिळू शकणार नाही. तपश्चर्येने अनंतांना प्राप्त करून घेऊ म्हणाल तर कितीही जन्म घेतले तरी देखील हे शक्य होणार नाही. अनंत दर्शन मिळणे कालत्रयी शक्य होणार नाही. परंतु भक्तीने मात्र तुम्ही त्यांना थांबवू शकाल, पाहू शकाल.

धन संपत्तीत देखील फरक आहे, एक सात्विक संपत्ती आणि एक अघोर संपत्ती. कष्ट करून, कर्तव्य करून किंवा जी वडिलोपार्जित प्राप्त झाली ती सत संपत्ती. परंतु इतरांना त्रास देऊन, खोटे बोलून, विश्वासघात करून प्राप्त झाली ती अघोर संपत्ती! सात्विक संपत्तीला विचार असतो, अघोर संपत्तीला विचार कुठला? अघोर संपत्ती कमवणारे अघोर अविचाराने पाहणार! कितीही अघोर संपत्ती एखाद्याकडे असली तरी अंतिम त्याची अधोगतीच होणार! परंतु भक्ती मार्गाने जाणारे, सत संपत्तीचा संचय करणाऱ्यांच्या ठायी मात्र शांती, समाधान आणि प्रगतीच असणार! सात्विक संपत्तीला पुरवणी असते. अघोर संपत्तीला पुरवणी नसते. अघोर संपत्ती ज्याच्याजवळ असते त्यांच्याजवळ समाधान कधीही नसते. परंतु सात्विक संपत्ती ज्या ठिकाणी असते तेथे सदैव समाधान असते. समाधान हीच खरी आपली लक्ष्मी आहे. भक्तीचे मूळ अंग म्हणजे समाधान! समाधानी वृत्तीच मानवाजवळ हवी. ©️

You cannot copy content of this page