श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज –
भक्तीचे अंग म्हणजे अखंड नाम! महान चैतन्य शक्ती, चितशक्ती म्हणजेच अखंड नाम!
या नामाच्या जोरावर अघोरांचा नाश केला. अनंतांचे संदेश घेणे तर ते केवळ नामाच्याच सत्तेने. म्हणून नामस्मरण श्रेष्ठ,
भक्तीचे हे मूळ द्वार आहे. नामाशिवाय भक्तीचा दरवाजा उघडणे शक्य नाही. तेथे अहंकार उपयोगाचा नाही. लबाड्या उपयोगाच्या नाहीत. सद्गुरूंना बनविणे उपयोगाचे नाही. या सर्वस्वांची नोंद होते. सद्गुरूंच्या नजरेतून हे सुटणे शक्य नाही. ज्याचे अखंड नाम तुम्ही घेता, ज्याचे स्मरण तुम्ही करता तेच अखंड नामाच्या गतीने तुमच्यातच असतात. तुमच्या वेगळे जर ते नाहीत, तर त्यांना तुम्ही कसे बनवू शकाल?
सद्गुरूंना सेवेकरी काही कमी त्रास देतात का? पण सद्गुरूंनी त्रास असे कधी म्हटले आहे का? ते विचार करतात, अरे या मानवी सेवेकऱ्याने किती जन्म घेतले आहेत अन आता जर तो पुन्हा अनाठायी गेला तर कुठे व कसा भटकेल हे सांगता येत नाही. ही चिंता सद्गुरूंना असते. किती श्रेष्ठत्व आहे लक्षात घ्या. ते क्षणिक पहात नाहीत…©️
