श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – जरी स्थूलात वा स्थूलाने या आघोरांचा नाश केला तरी देखील सूक्ष्माने त्याच अघोरांनी मानवी देहावर, मनावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केलाच. आपण पाहतच आहात की आजही अशांचे मानव उपासक आहेत की नाहीत?अशा तऱ्हेने अघोर उपासना करीत, तामस उपासना करीत, जर एखाद्याने म्हटले की मी भक्ती करतो, तर याला काही आधार आहे का?
आपल्याला काय पहायचे आहे, काय मिळवायचे आहे, हे प्रत्येकाने विचारपूर्वक पाहिले पाहिजे. आपला राजमार्ग कोणता तर भक्ती! आपल्याला कोणत्या मार्गाने जायचे आहे तर भक्तीने! आपल्याला काट्याकुट्यातून जायचे नाही, गिरीकंदरातून जायचे नाही, दगड खड्ड्यातून जायचे नाही, फक्त राज मार्गाने वाटचाल करावयाची आहे. जरी अवधी लागला तरी आपण आपल्या इप्सित ठिकाणी पोहोचणारच!
अघोरांची निर्मिती केली ही सतानेच आणि नाशही सतानेच केला, करणार आहे याबद्दल शंका नाही. एवढी २५ अवतार कार्य झाली पण ॐकारांचे निमित्त ठेवून त्यांचा नाश सतानीच केला. भक्तीचा नाश झाला नाही तर अघोरांचा नाश झाला. अघोर भक्ति, अहंकारी भक्ती, दुष्ट बुद्धीने वागण्याची तऱ्हा, मत्सर, द्वेष, याचा नाश झाला.
आपल्याला माहीतच आहे कोपिष्ट विश्वामित्र कसा होता. गुरुदेवांचे नाव घेतल्याबरोबर क्रोधायमान होत असे. कुठे आमचे गुरुदेव वशिष्ठ संयमी, शांत अन ज्ञानयुक्त गतीने जाणारी ज्योत. कधीकधी आम्ही चिडतो परंतु ते चिडत नाहीत, आम्ही त्यांना सांगितले या कलीयुगात आपणासारखे संयमन पाळता येणार नाही अन त्यांनीही ते मान्य केले. ते सांगतात, सता आम्ही त्या युगात पाळले परंतु आता मी ही पाळणार नाही. ते कसे तर दयाशील, क्षमाशील, शितल, शांत तत्व आहे. त्यांच्यापुढे सर्वजण लिन असतात. ©️
