Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूंबद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व दिसणार …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु हे दयाघन तत्व आहे. ते सर्वस्व विसरून आदेश देतात. सेवेकर्‍याला प्रसंगातून सोडवून मार्गस्थ करतात. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – हे मना तुझ्या ठिकाणी सद्गुरूंबद्दल का सद्भावना निर्माण होत नाही? माझ्या सद्गुरूं बद्दल, हे मना …

सत सताचीच बाजू घेणार…©️

सत सताचीच बाजू घेणार…©️

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज –

भक्ती हा एक मोठा राजमार्ग आहे. त्यात काटेकुटे, खाचखळगे काही नाहीत. परंतु तामसी वृत्तीच्या मार्गात काटेकुटे, खाचखळगे सर्वच आहे. त्यातून तरला तर ठीक, नाहीतर गेला खड्ड्यात! परंतु भक्तिमार्ग मात्र साधा सरळ आहे.

आता आपण जाणताच की वेगवेगळी शुद्धीकरणे आपण पाहीलीत, अनुभवलीत. या शुद्धीकरणात आपणा सर्वांना हे कळून चुकले होते की अघोरांकडे वेगवेगळे वरदहस्त, अमरत्व अशा वेगवेगळ्या गोष्टी होत्या. एवढेच काय त्यांच्याकडे अमृत व संजिवनी देखील होती. अशा ज्योतींना शुद्धीकरणात कसे घ्यावे असा आमच्यापुढे प्रश्न होता. परंतु शुद्धीकरणासाठी आम्हाला मार्गदर्शन कोणी केले तर सताने !

जरी अघोरांना वरदहस्त होते तरी बाजू सताचीच घेतली. जरी कोणी कितीही आटापिटा केला तरी बाजू सताचीच  घेणार. परंतु अशी वेळ आली की अघोर सताला डोईजड होत आहे असे आम्हाला शुद्धीकरण करताना वाटू लागले. त्यावेळी आम्हाला मार्गदर्शन कोणी केले तर सताने! शेवटी सत बाजू कोणाची घेते तर सात्विकांचीच! सत सताचीच बाजू घेणार, अघोरांची बाजू कधीही घेणार नाही. कधी कधी आपण पाहतो, अनुभवतो की सात्विक ज्योती देखील चिडतात…©️

You cannot copy content of this page