Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

नाम – अखंड चित शक्ती ©️

नाम – अखंड चित शक्ती ©️

भक्ती मध्ये जे नाम आहे, ती महान अखंड चित शक्ती आहे. या एका नामावर त्रिभुवन तरलेले आहे. तेच नामस्मरण तुम्ही करीत आहात. परंतु कलियुगी मानवांना वेळ मिळत नाही. इतर मायावी कर्तव्यासाठी वेळ मिळतो, परंतु नामस्मरण करायला वेळ मिळत नाही. सेवेकऱ्यांनो किती वेळा प्रवचनात मी तुम्हाला सांगितले आहे,”दिवसातला तुमचा वेळ किती फुकट जातो.”

जाते घडी ही आपुली साधा, करा काय ते आतां करा | आजचा दिवस गेला उद्याचा दिवस आला. आयु:र्मान वाढते आहे अन प्रत्येक मानवाचे आयु:र्मानाची मर्यादा किती आहे? मग आयुष्यात मिळावायचे काय? तर नामस्मरण. ती संपत्ती तुम्हाला जमावता येत नाही. नामाच्या या महान चित शक्तिनेच या अघोरांचा नाश करता आला. तिच चितशक्ती तुम्हाला बहाल केली आहे. ध्यान करा, नामस्मरण करा अन तिच चितशक्ती मिळविण्याचा, संचय करण्याचा प्रयत्न करा. हिच ती भक्ती. सप्तऋषी देखील याच मार्गाने गेले. संतांनी देखील याच मार्गाचा अवलंब केला. आज ते सर्व सताच्या सानिध्यात आहेत. आपणाला माहित आहे, कित्येक कोटी अघोरांचा नाश झाला. शुद्धीकरणात ज्योतींचे तुकडे करून नाश केला. त्या ज्योती सांधण्याची शक्ती केवळ अनंतांची आहे. इतर कोणीही ते करू शकणार नाही. आपण जाणताच की अघोर ज्योती सुरुवातीला तुकडे न केल्यामुळे परत येत होत्या. नकली क्षिराब्धी बनलेला जालंधर आणि त्याचे सहकारी त्या नाश केलेल्या ज्योतींना वर काढत होते. नंतर आम्ही ज्यावेळी बंधन टाकायला सुरुवात केली तेव्हा नकली क्षिराब्धी काही करू शकले नाहीत. वलय टाकल्यानंतर वलयाच्या आत त्याला काही करता येईना. आम्हाला शिक्षण घ्यायला लावले कोणी तर अघोरांनी! परंतु शेवटी विजय कोणाचा तर सताचा ! भक्तीचाच विजय आहे.

वृंदा वर्तुळात जाऊन राहिली,सताच्या वर्तुळात शैवाने तिला आत नेऊन ठेवले. तिची भक्ती श्रेष्ठ होती, तिची तप:श्चर्या खूप! पतिव्रता या एकाच नात्याने तिला सर्व अधिकार होते. त्रिगुणांना देखील या अघोरांनी हाकलून काढले होते. कलियुगात या अघोरांनी अशी तऱ्हा करून ठेवली होती. परंतु या सर्वांचा नाश भक्तीच्या अंगानेच केला. ©️

You cannot copy content of this page