Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – प्रारब्धाप्रमाणे,पूर्व संचितानुसार त्यांनी आम्हाला आपल्या सानिध्यात घेतले आहे, अशा त्या माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी हे मना …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – शरीर मन सोडून नाही आणि मन शरीर सोडून नाही. शरीराला त्रास झाला तर मनाला त्रास …

“तुरत दान महापुण्यम” नाही. पुढे ही ज्योत कुठे जाणार आहे याची सर्वस्वी नोंद त्यांच्याजवळ असते. सद्गुरूंना सर्वस्वाची कल्पना असते. अन हाच राजमार्ग …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – आपणाला माहित आहे कित्येक कोटी अघोरांचा नाश झाला. शुद्धीकरणात ज्योतींचे तुकडे करून नाश केला. त्या …

सत भक्तीचे स्वरूप (१) ©️

सत भक्तीचे स्वरूप (१) ©️

हा एक महान राजमार्ग आहे. तेथे काटे, काच खळगे, खड्डे काहीही नाहीत. इतर मार्गाप्रमाणे हा मार्ग नाही. हा अत्यंत साधा सोपा सरळ मार्ग आहे. पण दोन्ही टोके सांभाळायची. आपण जाणताच हाताच्या बाजू दोन, एक उजवी अन दुसरी डावी. त्या दोन बाजूंमध्ये उजवा गट भक्ती आणि डावा गट तामस. हटयोग, प्राणायाम ही तामस लोकांची भक्ती आहे. तंत्र मंत्र, ऋद्धी सिद्धी ही सर्व तामस लोकांची उपासना.

भक्तीयुक्त उपासना कोणती तर अखंड नाम! त्या परते दुसरे काही नाही. जे सत पदाचे अखंड नाम सतपदाच्या आसनावरून बहाल केलेले आहे त्याचेच नामस्मरण करणे आणि त्यांच्याच दर्शनात दर्शनयुक्त राहणे, हेच त्याचे मर्म! अशा स्थितीत राहिले ते ऋषीमुनी, ब्रह्मऋषी, सप्तऋषी आणि त्यांची गुरुकुले! अन या चौकट मुनींच्या-कोपीष्ट मुनींची, तामस मुनींची गुरुकुले त्यात शुक्राचार्य, दुर्वास, विश्वामित्र अन त्यांची गुरुकुले, राक्षस.

अघोर ज्यांना संजीवनी मिळाली होती. ही वेगळी चाकोरी आणि भक्ती ही वेगळी चाकोरी! तामसी वृत्तीच्या लोकांचा ताफा मोठा होता. त्यांच्या बाजूला भरपूर अघोर होते. परंतु ब्रह्मर्षी, सप्तऋषी यांचा ताफा मात्र लहान होता, परंतु तेजस्वी होता. तेजोबलासहित होता. याचे कारण सत कोणाच्या बाजूला होते तर सात्विकांच्या! सत त्यांनाही (तामसी वृत्तीच्या लोकांनाही) सांगत असे की मी तुमच्या बरोबर देखील आहे. कारण दोन्ही प्रवृत्ती सत आणि तामस, असलेले लोक हे त्यांचे भक्त होते. दोन्हीही सताचेच भक्त.तामसी लोकांची विपरीत बुद्धी तर सात्विकांची सरळ बुद्धी! म्हणजेच भक्तीचा मार्ग साधा सरळ पण राजमार्ग! ©️

You cannot copy content of this page