श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज –
काही सेवेकरी दरबारात आल्यानंतर जवळ बसण्याचा प्रयत्न करतात, परंतु तुम्ही हे लक्षात ठेवा,”जवळ असो अगर लांब असो, सद्गुरूंचे प्रत्येक सेवेकऱ्यावर संपूर्ण लक्ष असते.” मन विशाल असेल तर तसे तरंग, असे विचार मनात येणार नाहीत. जे मन विशाल, मोकळे असते तेच सताबद्दल, सद्गुरूंबद्दल सदभावनेने ओथंबलेले असते, म्हणून सेवेकऱ्यांनो हे लक्षात घ्या, माया हीच तुम्हाला सतापासून दूर नेते.
सदगुरु, सत जाणून बुजून कोणत्याही भक्ताला दूर करीत नाहीत. मन जर सदभावनेने ओथंबलेले असेल तर तो सतापासून, सद्गुरूंपासून कदापिही दूर जाणे शक्य नाही. प्रत्येक सेवेकर्याने ही भावना सदैव मनात बाळगायला हवी की ज्या ठिकाणी मी आहे, त्या ठिकाणी माझे सद्गुरु माझ्याबरोबर असणारच! मी आणि सद्गुरु वेगळे नाहीत. जगात सर्व काही तुम्हा आम्हापासून दूर जाऊ शकेल, परंतु सद्गुरु कदापिही तुमच्यापासून दूर जाणार नाहीत….©️
