Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – आपणाला माहित आहे कित्येक कोटी अघोरांचा नाश झाला. शुद्धीकरणात ज्योतींचे तुकडे करून नाश केला. त्या …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – ही भक्ती इतकी अत्यंत श्रेष्ठ आहे की त्याची योग्यता ऋद्धी-सिद्धी, तंत्र-मंत्र, याबरोबर तुम्ही करू शकत …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – आपण पाहतोच की आपल्याकडे काही मानवांची शुद्धीकरण स्थिती होत असताना काही बलाढ्य तर काही महाबलाढ्य, …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – भक्ती हा एक मोठा राजमार्ग आहे त्यात काटे कुटे, खाच खळगे काही नाही. परंतु तामसी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

श्रीसमर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – आपल्याला माहीतच आहे कोपिष्ट विश्वामित्र कसा होता. गुरुदेवांचे नाव घेतल्याबरोबर तो क्रोधायमान होत असे. कुठे आमचे …

अघोरांचा नाश…भक्तीच्या अंगानेच ©️

अघोरांचा नाश…भक्तीच्या अंगानेच ©️

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज –

आपणाला माहित आहे कित्येक कोटी अघोरांचा नाश झाला. शुद्धीकरणात ज्योतींचे तुकडे करून नाश केला. त्या ज्योती सांधण्याची शक्ती केवळ अनंतांची आहे. इतर कोणीही ते करू शकणार नाहीत. आपण जाणताच की अघोर ज्योती सुरुवातीला तुकडे न केल्यामुळे परत येत होत्या. नकली क्षिराब्धी बनलेला जालंधर आणि त्याचे सहकारी त्या नाश केलेल्या ज्योतींना वर काढत होते. नंतर आम्ही ज्यावेळी बंधन टाकायला सुरुवात केली तेव्हा नकली क्षिराब्धी काही करू शकले नाहीत. वलय टाकल्यानंतर वलयाच्या आत त्याला काही करता येईना.

आम्हाला शिक्षण घ्यायला लावले कोणी? तर अघोरांनी! परंतु शेवटी विजय कोणाचा? तर सताचा, भक्तीचाच विजय आहे.

वृंदा वर्तुळात जाऊन राहिली, सताच्या वर्तुळात शैवाने तिला आत नेऊन ठेवले. तिची भक्ती श्रेष्ठ होती, तिची तपश्चर्या खूप! पतिव्रता या एकाच नात्याने तिला सर्व अधिकार होते. त्रिगुणांना देखील या अघोरांनी हाकलून काढले होते. कलियुगात या अघोरांनी अशी तऱ्हा करून ठेवली होती. परंतु या सर्वांचा नाश भक्तीच्या अंगानेच केला…©️

You cannot copy content of this page