Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

श्रीसमर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – आपल्याला माहीतच आहे कोपिष्ट विश्वामित्र कसा होता. गुरुदेवांचे नाव घेतल्याबरोबर तो क्रोधायमान होत असे. कुठे आमचे …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

जाते घडी ही आपुली साधा। ©️

जाते घडी ही आपुली साधा। ©️

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज –

भक्ती मध्ये जे नाम आहे, ती महान अखंड चित शक्ती आहे. या एका नामावर त्रिभुवन तरलेले आहे. तेच नामस्मरण तुम्ही करत आहात. परंतु कलियुगी मानवांना वेळ मिळत नाही. इतर मायावी कर्तव्यासाठी वेळ मिळतो. परंतु नामस्मरण करायला वेळ मिळत नाही. सेवेकऱ्यांनो किती वेळा प्रवचनात मी तुम्हाला सांगितले आहे, ”दिवसातला तुमचा वेळ किती फुकट जातो.”

जाते घडी ही आपुली साधा। करा काय ते आता करा।।

आजचा दिवस गेला उद्याचा दिवस आला. आयुर्मान वाढते आहे अन प्रत्येक मानवाचे आयुर्मानाची मर्यादा किती आहे? मग आयुष्यात मिळावायचे काय? तर नामस्मरण. ती संपत्ती तुम्हाला जमवता येत नाही. नामाच्या या महान चित शक्तिनेच या अघोरांचा नाश करता आला. तिच चित्शक्ती तुम्हाला बहाल केली आहे. ध्यान करा, नामस्मरण करा अन तिच चित्शक्ती मिळविण्याचा, संचय करण्याचा प्रयत्न करा. हीच ती भक्ती. सप्तऋषी देखील याच मार्गाने गेले. संतांनी देखील याच मार्गाचा अवलंब केला. आज ते सर्व सताच्या सानिध्यात आहेत. आपणाला माहित आहे कित्येक कोटी अघोरांचा नाश झाला. शुद्धीकरणात ज्योतींचे तुकडे करून नाश केला. त्या ज्योती सांधण्याची शक्ती केवळ अनंतांची आहे. इतर कोणीही ते करू शकणार नाहीत. आपण जाणताच की अघोर ज्योती सुरुवातीला तुकडे न केल्यामुळे परत येत होत्या. नकली क्षिराब्धि बनलेला जालंधर आणि त्याचे सहकारी त्या नाश केलेल्या ज्योतींना वर काढत होते. नंतर आम्ही ज्यावेळी बंधन टाकायला सुरुवात केली तेव्हा नकली क्षिराब्धि काही करू शकले नाहीत. वलय टाकल्यानंतर वलयाच्या आत त्याला काही करता येईना. आम्हाला शिक्षण घ्यायला लावले कोणी तर अघोरांनी! परंतु शेवटी विजय कोणाचा तर सताचा ! भक्तीचाच विजय आहे. वृंदा वर्तुळात जाऊन राहिली,सताच्या वर्तुळात शैवाने तिला आत नेऊन ठेवले. तिची भक्ती श्रेष्ठ होती, तिची तपश्चर्या खूप! पतिव्रता या एकाच नात्याने तिला सर्व अधिकार होते. त्रिगुणांना देखील या अघोरांनी हाकलून काढले होते. कलियुगात या अघोरांनी अशी तऱ्हा करून ठेवली होती. परंतु या सर्वांचा नाश भक्तीच्या अंगानेच केला..©️

You cannot copy content of this page