Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

ठेविले अनंते तैसेची रहावे। चित्ती असू द्यावे समाधान।। आपले सद्गुरु जे आपल्याला सांगत असतात त्याची छाननी करणे, उजळणी करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य …

तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

सत पाहता येईल…केव्हा? ©️

सत पाहता येईल…केव्हा? ©️

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – आहे ते सत आहे, सदभावनेने पाहता आले तर ते आहे. सदभावना नसेल तर पाहता येणार नाही. ज्योत जर सताबद्दल सद्गुरुंबद्दल सदभावनेने ओथंबलेली असेल तर तिला सत पाहता येईल अन्यथा नाही. त्या सेवेकऱ्याला, त्या ज्योतीला दाखवितात पहा मी कसा आहे? नूसत्या मायाब्रम्हात गुरफटलेला असेल तर त्या सेवेकर्‍याला त्यांचे रूप पाहता येणार नाही, अनुभव घेता येणार नाही. हे मना ! माझ्या हृदयस्थ जे सत, जे सद्गुरु विराजमान झालेले आहेत, त्यांना शरण जा. सर्वस्व त्यांना अर्पण करून ते कसे आहेत हे पाहण्याचा प्रयत्न कर. हे मना त्या सताची शक्ती अमर्याद आहे, ते क्षणात त्रिगुणांनाही लय करू शकतात तेथे तुम्हा आम्हा मानवांचा काय पाडाव लागणार? आपल्या सद्गुरूंना,आपल्या बाबांना जर सेवेकर्‍यांनी ओळखले आणि जर त्यांनी सहज जरी प्रश्न विचारले तर सतशुद्ध भावनेने उत्तर देता आले पाहिजे, हेतू रहित, आत बाहेर काही न करता सांगता आले पाहिजे. उत्तर हेतू रहित दिले पाहिजे. ज्यावेळी एखाद्या सेवेकर्‍यावर प्रसंग येतो, त्यावेळी त्याचे माया ब्रह्म त्याच्या उपयोगी येते का?

काही सेवेकरी दरबारात आल्यानंतर जवळ बसण्याचा प्रयत्न करतात, परंतु तुम्ही हे लक्षात ठेवा,” जवळ असो अगर लांब असो, सद्गुरूंचे प्रत्येक सेवेकऱ्यावर संपूर्ण लक्ष असते.” मन विशाल असेल तर तसे तरंग, असे विचार मनात येणार नाहीत. जे मन विशाल, मोकळे असते तेच सताबद्दल, सद्गुरूंबद्दल सदभावनेने ओथंबलेले असते. म्हणून सेवेकऱ्यांनो हे लक्षात घ्या, माया हीच तुम्हाला सतापासून दूर नेते. सदगुरु, सत जाणून बुजून कोणत्याही भक्ताला दूर करीत नाहीत. मन जर सद भावनेने ओथंबलेले असेल तर तो सतापासून, सद्गुरूंपासून कदापिही दूर जाणे शक्य नाही. प्रत्येक सेवेकर्‍याने ही भावना सदैव मनात बाळगायला हवी की ज्या ठिकाणी मी आहे, त्या ठिकाणी माझे सद्गुरु माझ्याबरोबर असणारच! मी आणि सद्गुरु वेगळे नाहीत. जगात सर्व काही तुम्हा आम्हापासून दूर जाऊ शकेल परंतु सद्गुरु कदापिही तुमच्यापासून दूर जाणार नाहीत…©️

You cannot copy content of this page