Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

ठेविले अनंते तैसेची रहावे। चित्ती असू द्यावे समाधान।। आपले सद्गुरु जे आपल्याला सांगत असतात त्याची छाननी करणे, उजळणी करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य …

तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

ठेविले अनंते…©️

ठेविले अनंते…©️

ठेविले अनंते तैसेची रहावे। चित्ती असू द्यावे समाधान।।

आपले सद्गुरु जे आपल्याला सांगत असतात त्याची छाननी करणे, उजळणी करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. जर सद्गुरूंनी सांगितलेली एखादी गोष्ट लक्षात आली नाही तर समजावून सांगतील, परंतू तुम्ही भक्तीची चाकोरी सोडू नका. अखंड नाम ही महान चित शक्ती आहे. भक्ती आणि तपोभूमी यांची तुलना होऊ शकत नाही. या दोघांमध्ये भक्तीच सर्वश्रेष्ठ आहे. सत युगापासूनच्या ज्योतींनी अदृश्य तऱ्हेने सत सानिध्य मिळवायचे आहे. प्रत्येक सेवेकऱ्याने याकरीता मनाने अत्यंत शुद्ध राहणे आवश्यक आहे. नामस्मरणाच्या गतीने गेल्यानंतर अनंतांना तुम्ही डोळे भरून पाहू शकाल.

त्रिगुण कोणते तर ब्रह्मा, विष्णू, महेश अन त्रिगुणांचेच हे कर्तव्य आहे की या विश्वाचा कारभार हाकणे. क्षिराब्धी केवळ त्यांना आदेश देऊन त्यावर देखरेख ठेवणार. सुरवातीला आमची याच श्रद्धेने कालक्रमणा होत होती की हे सर्व जे आहेत ते आमच्या अनंतांनीच निर्माण केलेले आहेत, परंतु ज्यावेळी आम्ही शोध घेण्यास सुरुवात केली, शुद्धीकरणास सुरुवात झाली त्यावेळी आम्हाला संदेश मिळाले अघोरांचा नाश करा. अघोर म्हणजे राक्षस…©️

You cannot copy content of this page