Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – प्रारब्धाप्रमाणे,पूर्व संचितानुसार त्यांनी आम्हाला आपल्या सानिध्यात घेतले आहे, अशा त्या माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी हे मना …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – शरीर मन सोडून नाही आणि मन शरीर सोडून नाही. शरीराला त्रास झाला तर मनाला त्रास …

आपला राजमार्ग कोणता? ©️

आपला राजमार्ग कोणता? ©️

अशा तऱ्हेने अघोर उपासना करत, तामस उपासना करत, जर एखाद्याने म्हटले की मी भक्ती करतो, तर याला काही आधार आहे का? आपल्याला काय पहायचे आहे, काय मिळवायचे आहे, हे प्रत्येकाने विचारपूर्वक पाहिले पाहिजे. आपला राजमार्ग कोणता तर भक्ती! आपल्याला कोणत्या मार्गाने जायचे आहे तर भक्तीने! आपल्याला काट्याकुट्यातून जायचे नाही, गिरीकंदरातून जायचे नाही, दगड खड्ड्यातून जायचे नाही, फक्त राज मार्गाने वाटचाल करावयाची आहे. जरी अवधी लागला तरी आपण आपल्या इप्सित ठिकाणी पोहोचणार!

अघोरांची निर्मिती केली ही सतानेच आणि नाशही सतानेच केला, करणार आहे याबद्दल शंका नाही. एवढी २५ अवतार कार्य झाली पण ॐकारांचे निमित्त ठेवून त्यांचा नाश सतानीच केला. भक्तीचा नाश झाला नाही तर अघोरांचा नाश झाला. अघोर भक्ति, अहंकारी भक्ती, दुष्ट बुद्धीने वागण्याची तर्हा, मत्सर, द्वेष, याचा नाश झाला.

आपल्याला माहीतच आहे कोपिष्ट विश्वामित्र कसा होता. गुरुदेवांचे नाव घेतल्याबरोबर तो क्रोधायमान होत असे. कुठे आमचे गुरुदेव वशिष्ठ संयमी, शांत अन ज्ञानयुक्त गतीने जाणारी ज्योत, कधीकधी आम्ही चिडतो परंतु ते चिडत नाहीत, आम्ही त्यांना सांगितले या कलीयुगात आपणासारखे संयमन पाळता येणार नाही अन त्यांनीही ते मान्य केले. ते सांगतात, सता आम्ही त्या युगात पाळले परंतु आता मीही पाळणार नाही. ते कसे तर दयाशील, क्षमाशील, शितल, शांत तत्व आहे. त्यांच्यापुढे सर्वजण लिन असतात. ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन त्यांच्या शक्तीही त्या ब्रह्मर्षी पदासमोर नतमस्तक असतात. यावरून आपण जाणले पाहिजे की मानवात असून देखील त्यांची योग्यता किती श्रेष्ठ होती. असे ते गुरुदेव पितामह! अन त्यांचे पद मिळवायला कोपिष्ट यातायात करीत होता. त्याकरता तो गुरुकुलांचा नाश करायला निघाला होता, गुरुकुलातील योगी, योगिनींचा छळ करायला निघाला, ब्रम्हर्षी पद हे भक्तीचे पद! अनंतांनी बहाल केलेले पद!”. ©️

You cannot copy content of this page