Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

श्रीसमर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – आपल्याला माहीतच आहे कोपिष्ट विश्वामित्र कसा होता. गुरुदेवांचे नाव घेतल्याबरोबर तो क्रोधायमान होत असे. कुठे आमचे …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

भक्तीचे महात्म्य…©️

भक्तीचे महात्म्य…©️

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज –

ही भक्ती इतकी अत्यंत श्रेष्ठ आहे की त्याची योग्यता ऋद्धी-सिद्धी, तंत्र-मंत्र याबरोबर तुम्ही करू शकत नाही. इतर शक्तींपेक्षा आपली भक्ती कितीतरी पटींनी श्रेष्ठ आहे. भक्तीयुक्त गतीने जर मानव गेला तर त्याचे विवरण इतर शक्ती करू शकत नाहीत.

गेल्या ३0 वर्षात जी काही कर्तव्यें या आसनाकडून घडली त्यावरून आपण हे नक्कीच म्हणू शकतो की भक्ती अत्यंत श्रेष्ठ आहे. कितीही महाबलाढ्य ज्योती असो, आसनाचे आदेश घेऊन निघालेल्या ज्योतीं समोर त्यांचे काही चालत नसे. या अघोरांनी सर्व काही प्राप्त करून घेतले होते तरी देखील आसनाने कर्तव्यासाठी पाठविलेल्यांचा त्यांना थांग लागत नव्हता. मग आता तुम्हीच सांगा श्रेष्ठ कोण? भक्ती की अघोर तपश्चर्या? तर भक्तीच सर्वश्रेष्ठ!

एकाच नामाच्या जोरावर चालणारी ही भक्ती! अघोरांकडे मात्र अनेक तऱ्हा मंत्र-तंत्र, ऋध्दी-सिध्दी. अघोरांचा नाश करण्याकरिता मार्गदर्शन कोणाचे? तर सताचे. म्हणून या सर्वस्वी अघोरांचा आम्हाला नि:पात करता आला. या सर्वस्वाचे मूळ कोणते तर भक्ती! भक्तीपुढे अघोर तपश्चर्या कूचकामी आहे. परंतु आजच्या कलियुगी मानवांना भक्ती एवढी प्रिय वाटत नाही…©️

You cannot copy content of this page