Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – भक्ती हा एक मोठा राजमार्ग आहे त्यात काटे कुटे, खाच खळगे काही नाही. परंतु तामसी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

श्रीसमर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – आपल्याला माहीतच आहे कोपिष्ट विश्वामित्र कसा होता. गुरुदेवांचे नाव घेतल्याबरोबर तो क्रोधायमान होत असे. कुठे आमचे …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

राजमार्ग…©️

राजमार्ग…©️

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – भक्ती हा एक मोठा राजमार्ग आहे त्यात काटे कुटे, खाच खळगे काही नाही. परंतु तामसी वृत्तीच्या मार्गात काटे कुटे, खाचखळगे सर्वच आहे. त्यातून तरला तर ठीक, नाहीतर गेला खड्ड्यात! परंतु भक्तिमार्ग मात्र साधा सरळ आहे.

आता आपण जाणताच की वेगवेगळी शुद्धीकरणे आपण पाहीली, अनुभवली. या शुद्धीकरणात आपण सर्वांना हे कळून चुकले होते की अघोरांकडे वेगवेगळे वरदहस्त, अमरत्व अशा वेगवेगळ्या गोष्टी होत्या. एवढेच काय त्यांच्याकडे अमृत देखील होते. अशा ज्योतींना शुद्धीकरणात कसे घ्यावे असा आमच्यापुढे प्रश्न होता. परंतु शुद्धीकरणासाठी आम्हाला मार्गदर्शन कोणी केले तर सताने ! जरी अघोरांना वरदहस्त होते तरी बाजू सताचीच घेतली. जरी कोणी कितीही आटापिटा केला तरी बाजू सताचीच घेणार. परंतु अशी वेळ आली की अघोर सताला डोईजड होत आहे, जसे आम्हाला शुद्धीकरण करताना वाटू लागले त्यावेळी आम्हाला मार्गदर्शन कोणी केले तर सताने! शेवटी सत बाजू कोणाची घेते तर सात्विकांचीच! सत सताचीच बाजू घेणार, अघोरांची बाजू कधीही घेणार नाही.

कधी कधी आपण पाहतो, अनुभवतो की सात्विक ज्योती देखील चिडतात, अघोर मातले आहे, त्यांचा आम्हाला त्रास होत आहे. आज तुम्ही पहातच आहात, अनुभवत आहात, गेली तीस वर्षे अघोरांचा नाश करत आहोत. स्थुलातून गेलेल्या त्या अघोरांनी सूक्ष्माने मानवावर कब्जा केला. द्वापार युगापासून जेवढे अघोर अवतारकार्यात मारले, ते सर्व अघोर सूक्ष्माने होते. सूक्ष्माने ते कार्य करत होते. गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना शक्य होईल का? ज्यांच्यासाठी ॐकारांना जन्म घ्यावा लागला, ज्यांच्याकरिता अनंतांनी ॐकारांना आदेश देऊन जन्म घ्यायला भाग पाडले अन त्यांना कर्तव्याची दिशा दिली, मग अशा अघोरांच्या सूक्ष्माचा नाश तुम्ही कलियुगी मानव करू शकाल का?…©️

You cannot copy content of this page