Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – आपण पाहतोच की आपल्याकडे काही मानवांची शुद्धीकरण स्थिती होत असताना काही बलाढ्य तर काही महाबलाढ्य, …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – भक्ती हा एक मोठा राजमार्ग आहे त्यात काटे कुटे, खाच खळगे काही नाही. परंतु तामसी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

श्रीसमर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – आपल्याला माहीतच आहे कोपिष्ट विश्वामित्र कसा होता. गुरुदेवांचे नाव घेतल्याबरोबर तो क्रोधायमान होत असे. कुठे आमचे …

आंधळ्याशी जग …©️

आंधळ्याशी जग …©️

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – आपण पाहतोच की आपल्याकडे काही मानवांची शुद्धीकरण स्थिती होत असताना काही बलाढ्य तर काही महाबलाढ्य, ८५० पायऱ्यांच्या अघोर ज्योतींचा देखील नाश केला गेला आहे. सर्वस्व ज्या राक्षसाकडे होते, ऋद्धी-सिद्धी, तंत्र-मंत्र अशा देखील अघोरी ज्योतींचा या शुद्धीकरणातून नाश केला गेला आहे.

ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या एका अभंगात म्हटले आहे, “आंधळ्याशी जग सारेची आंधळे।” जरी स्थूलात वा स्थूलाने या आघोरांचा नाश केला, तरी देखील सूक्ष्माने त्याच अघोरांनी मानवी देहावर, मनावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केलाच. आपण पाहतच आहात की आजही अशांचे मानव उपासक आहेत की नाही?

अशा तऱ्हेने अघोर उपासना करीत, तामस उपासना करीत, जर एखाद्याने म्हटले की मी भक्ती करतो, तर याला काही आधार आहे का? आपल्याला काय पहायचे आहे, काय मिळवायचे आहे, हे प्रत्येकाने विचारपूर्वक पाहिले पाहिजे. आपला राजमार्ग कोणता तर भक्ती! आपल्याला कोणत्या मार्गाने जायचे आहे तर भक्तीने! आपल्याला काट्याकुट्यातून जायचे नाही, गिरीकंदरातून जायचे नाही, दगड खड्ड्यातून जायचे नाही, फक्त राज मार्गाने वाटचाल करावयाची आहे. जरी अवधी लागला तरी आपण आपल्या इप्सित ठिकाणी पोहोचणार!…©️

You cannot copy content of this page