Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – आपण पाहतोच की आपल्याकडे काही मानवांची शुद्धीकरण स्थिती होत असताना काही बलाढ्य तर काही महाबलाढ्य, …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – भक्ती हा एक मोठा राजमार्ग आहे त्यात काटे कुटे, खाच खळगे काही नाही. परंतु तामसी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

श्रीसमर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – आपल्याला माहीतच आहे कोपिष्ट विश्वामित्र कसा होता. गुरुदेवांचे नाव घेतल्याबरोबर तो क्रोधायमान होत असे. कुठे आमचे …

भक्ती म्हणजे नामस्मरण…©️

भक्ती म्हणजे नामस्मरण…©️

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अघोरांची निर्मिती केली ही सतानेच आणि नाशही सतानेच केला, करणार आहे याबद्दल शंका नाही. एवढी २५ अवतार कार्य झाली पण ॐकारांचे निमित्त ठेवून त्यांचा नाश सतांनीच केला. भक्तीचा नाश झाला नाही तर अघोरांचा नाश झाला. अघोर भक्ति, अहंकारी भक्ती, दुष्ट बुद्धीने वागण्याची तऱ्हा, मत्सर, द्वेष, याचा नाश झाला.

आपल्याला माहीतच आहे कोपिष्ट विश्वामित्र कसा होता. गुरुदेवांचे नाव घेतल्याबरोबर क्रोधायमान होत असे. कुठे आमचे गुरुदेव वशिष्ठ संयमी, शांत अन ज्ञानयुक्त गतीने जाणारी ज्योत, कधीकधी आम्ही चिडतो परंतु ते चिडत नाहीत, आम्ही त्यांना सांगितले या कलीयुगात आपणासारखे संयमन पाळता येणार नाही अन त्यांनीही ते मान्य केले. ते सांगतात, सता आम्ही त्या युगात पाळले परंतु आता मीही पाळणार नाही. ते कसे तर दयाशील, क्षमाशील, शितल, शांत तत्व आहे. त्यांच्यापुढे सर्वजण लिन असतात. ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन त्यांच्या शक्तीही त्या ब्रह्मर्षी पदासमोर नतमस्तक असतात. यावरून आपण जाणले पाहिजे की मानवात असून देखील त्यांची योग्यता किती श्रेष्ठ होती. असे ते गुरुदेव पितामह! अन त्यांचे पद मिळवायला कोपिष्ट यातायात करीत होता. त्याकरता तो गुरुकुलांचा नाश करायला निघाला होता, गुरुकुलातील योगी, योगिनींचा छळ करायला निघाला,

ब्रम्हर्षी पद हे भक्तीचे पद! अनंतांनी बहाल केलेले पद!” ब्रह्म म्हणजे सर्व व्यापक आहे ते ब्रह्म”अन अशा गुरुदेवांची बरोबरी हा कोपिष्ट करू इच्छित होता. खरोखर कोपिष्ट अन गुरुदेवांची बरोबरी होऊ शकेल का? अघोरांनी कितीही सिद्धी मिळवली असेल, कितीही वनस्पती जमा केलेली असेल, तंत्र-मंत्र, ऋद्धी-सिद्धी अघोरांजवळ कितीही असो तरीदेखील भक्तीच्या पुढे हे सर्व थिटे आहे. भक्तीच्या पुढे त्यांचे काही चालत नाही. चालणार नाही. भक्ती म्हणजे काय एकच नामस्मरण अन सद्गुरू ध्यान! जे अखंड नाम बहाल करतात ते आणि ज्यांची तुम्ही पूजा करता या दोघांचे समीकरण झाले तीच भक्ती!..©️

You cannot copy content of this page