Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – हे मना तुझ्या ठिकाणी सद्गुरूंबद्दल का सद्भावना निर्माण होत नाही? माझ्या सद्गुरूं बद्दल, हे मना …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

जसा अपुला भाव (मनीचा)…©️

जसा अपुला भाव (मनीचा)…©️

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – यद भावो । तद भवतू ।। जसा भाव तसा सदभाव, तशीच भावना, असद्भाव तशीच कुभावना. आपली क्रिया कर्मे मायातीत असल्यामुळे आपण फक्त सदभावनेचे अवडंबर करतो. सद्गुरूंना असे दर्शविण्याचा आम्ही सतत प्रयत्न करतो. आम्ही सद्गुरूंच्या ठिकाणी ठाम आहोत असे दाखविण्याचा प्रयत्न करतो. आपले सद्गुरु आपल्याला सांगतात, संसारात राहून संसाराची पूर्णत्व कर्तव्यें कर. मुला माणसात आनंदाने रहा. समर्थ तुला सदैव देणारे आहेत. कोणतीही काळजी करू नकोस. पण एक लक्षात ठेव ही सर्वस्व माया आहे. ती नाशिवंत आहे. इतकेच काय तू जे कवच धारण केलेले आहेस ते देखील नाशिवंत आहे. परंतु तुझ्या आत वास करणारे जे अविनाशी आहेत, ते मात्र लय होणारे नाही. मग तू हा का विचार करत नाहीस, का यामुळे स्वतःला मायेत गुरुफटवून घेतोस?

काही काही मानव असे विपरीत वागत असतात आणि विचार करतात की मी जे काही करतो आहे ते कोणाला कळणार आहे? परंतु तुमच्यात जे सत आहे, जे अविनाशी आहे, त्याला मात्र पूर्णत्व जाण असते. अरे! जे अनंत, अविनाशी सत आहे त्यांचे लक्ष सूक्ष्म होऊनही सूक्ष्म असलेल्यावर असते, तर तुमच्यावर त्यांचे लक्ष असणार नाही का? अरे अनंत तत्व कसे आहे तर सर्व व्यापून अलिप्त तत्व आहे. सर्व ठिकाणी विखरून देखील अलिप्त आहे. मग असे हे जे विखुरलेले तत्त्व आहे त्यांच्या नजरेतून काही सुटणार आहे का? अरे सेवेकऱ्यांनो! तुमच्या आमच्यात सर्वस्व एकच तत्व भरून उरले आहे, फक्त आमच्या प्रकृतीत फरक आहे. मग आता तुम्हीच सांगा जे आतमध्ये वास करीत आहे ते तुमची कृती, क्रिया, कर्म जाणते की नाही? हे मानवा, हे सर्वस्व तू गुप्त ठेवतोस, हे मना तू हे कळू देत नाहीस. सेवेकर्‍यांनो तुमच्यावर प्रसंग आल्यानंतर मग सेवेकरी आसनाजवळ गयावया करू लागतो आणि सांगतो,” बाबा यातून केवळ आपणच मला सोडवू शकाल”….©️

You cannot copy content of this page