Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

मानवाने दानशूर होण्यापेक्षा…©️

मानवाने दानशूर होण्यापेक्षा…©️

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मनाचे मी तू रहीत होणे याचा अर्थ काय आहे कोणी सांगू शकेल का? आणि कोणी असे म्हटले आहे की मी आता मी-तू रहीत झालेलो आहे. तेव्हा कसे आणि कधी ते मनाला टिचकी मारतील ते कळणार नाही. हे कळण्याची, समजण्याची, जाणण्याची सेवेकर्‍यांनो तुमची कुवत नाही. कारण त्या अनंत शक्तीचा ठाव घेणे अत्यंत दुरापास्त आहे. करून अकर्ते पद आहे ते! त्या शक्तीचा मुकाबला त्रिभुवनात कोणीही करू शकणार नाही.

संतांनी हे सर्वस्व जाणले होते म्हणून ते म्हणत असत, ”अनंता मी तुमच्या चरणाचा दास आहे, माझे सर्वस्व आपणच आहात. मी माझा नाही आणि असे मन ज्यावेळी जिवात्म्याकडे व्यवहार करील त्यावेळी शिवात्मा प्रगट होईल”. हेतू रहीत झाल्याशिवाय जीवात्मा सापडणे शक्य नाही. प्रथम जीवात्मा शोधण्यासाठी, त्याच्या प्रत जाण्यासाठी हेतू रहीत होणे आवश्यक आहे.

सेवेकऱ्यांनी परोपकार जरूर करावा, परंतु सर्वप्रथम स्वतःची मानसिक शक्ती अजमावून परोपकार करा. जीवात्मा हा प्रत्येक अणू रेणूत भरलेला आहे. मानवाने दानशूर होण्यापेक्षा स्वयंपूर्ण होणे आवश्यक आहे. ही जीव शक्ती अनंतांनी, सतानी प्रत्येक प्राणीमात्रात फेकलेली आहे. मन हीच या शक्तीची मेख आहे. ते सत सांगते, अनंत सांगतात, सद्गुरु सांगतात की तुझे मनच तू माझ्या ठिकाणी लय कर. कृष्णांनी देखील पार्थाला हेच सांगितले की हे पार्था, तू तुझे मन माझ्यातच लय कर. परंतु सेवेकरी काय करतात तर,”वाटता जड भारी, मगच आठवावा श्रीहरी.” ते म्हणतात “काही प्रसंग आला तरच सद्गुरूंची आठवण करूया नाहीतर त्यांना उगाच कशाला त्रास द्या.”©️

You cannot copy content of this page