Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूंबद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व दिसणार …

जे स्वयमेव तत्व त्यांचीच ही शिवरात्र ! ©️

जे स्वयमेव तत्व त्यांचीच ही शिवरात्र ! ©️

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. त्यातच विष नावाचे रत्न निर्माण झाले. चांगली चांगली रत्ने दुसऱ्यांनी घेतली, पण कोणीही विष घ्यावयास तयार होईनात. मग ते टाकावयाचे कुठे? ते विष नामक रत्न आम्ही प्राशन केले.

ते घेतल्याबरोबर सर्व देहाची आग झाली. त्यामुळे स्थिरता नाही, शांती नाही अशी स्थिती झाली. कोण म्हणे, वासूकी सर्प गळ्यात बांधा, चंद्र मस्तकी धारण करा, गंगा बोलवा, तिला धारण करा. सांगितल्याप्रमाणे सर्व केले, पण शांती मिळाली नाही. तदनंतर समर्थ माऊलीने येऊन सांगितले की अरे, हे तू जप म्हणजे तुला शांती मिळेल. अन् तेव्हापासून मी त्याच ध्यानात आहे.

आज उपदेश आदी मायेला सांगितला आहे. जे स्वयमेव तत्व त्याचीच ही शिवरात्र ! हरकत नाही, पण अज्ञानाला हे सापडत नाही, म्हणून मानव भटकत आहे. ©️

You cannot copy content of this page