श्री समर्थ मालिक – सद्गुरु या विषयावर अनेक प्रवचने झाली आहेत. सद्गुरु हेच माझे सर्वस्वाचे निधान असे जर आहे तर भिक्षा मागायला लागेल का? लाघव होईल का? तुझे माझे निर्माण होईल का? म्हणून आपण कैवल्य पंथाचे प्रवचन सुरू केले होते. मग सेवेकर्यांनी या पंथाचा अंत घेतला आहे का?
कैवल्य पंथ म्हणजे क्षणोक्षणी कला दाखविणारे, कलेकलेने खेळ करणारे, धारणा करणारे, वर्तणूक वाढविणारे, कलेकलेने आता एक अन् क्षणात एक. आज एक तर उद्या दुसरे. भक्ताला दु:खी करणारे तेच अन् सुखी करणारे ही तेच. हाच कैवल्याचा पंथ आहे. याचा अंत घेण्याचा प्रयत्न करा.
मोह हा जर सद्गुरुं पेक्षा तुच्छ आहे असे मानले, तर सेवेकरी कधी फसणार नाही. सेवेकर्यांनी मोहात गुंतावे पण तो मोह शुद्ध सात्विक पाहिजे. मोह हा सताचा हवा, सताप्रती हवा. कारण संसार हाच मुळी त्रिगुणी आहे. त्रिगुणी ही माया आहे. माया ही सद्गुरुं पेक्षा वेगळी आहे. सद्गुरु सत् आहेत. अतिशयोक्ती करू नये. घर्षण झाल्याशिवाय चमत्कार होणार नाहीत. घर्षण झाल्याशिवाय निवड होणार नाही. घर्षण हे सेवेकरी सोडून होणार आहे. ©️
