Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

संधीकाळ आणि शुद्धीकरण ©️

संधीकाळ आणि शुद्धीकरण ©️

श्री क्षिराब्धी – संधी काळात जे सत् आहे, तेवढेच बाजूला करण्यात येईल. बाकी सर्वस्व घेण्यात येणार आहे. त्यातून सुक्या बरोबर थोडी ओल्याला सुद्धा झळ लागेल. याकरिता सेवेकरी व सेवेकरीणी यांना आपल्या नामस्मरणाच्या गतीने चालत असताना, संधी काळाचा तितका त्रास होणार नाही.

आतापर्यंत संधीकाळ संधीकाळ येणार असे किती वर्षे म्हणत आलो. संधीकाळ ही साधीसुधी गोष्ट नाही. सर्व बाजूंनी विचार करून कार्य करावे लागते. ते करताना सत् कुठे आहे, असत कुठे आहे, कोणत्या बाजूने कार्य करावयाचे त्याचा पूर्णत्व विचार करून कार्य करावे लागते. ते करायचे आहे.

कलियुगातील स्थूलांगी मानवाचेच शुद्धीकरण आहे असे नव्हे तर, सूक्ष्म, कारण, महाकारण, अणू, रेणू, परमाणू, यांचेही शुद्धीकरण चालू आहे. अन् आता स्थूल मानवाचे शुद्धीकरण आहे. त्यात चौथ्या टप्प्याचा शेष भागाचे शुद्धीकरण होणार आहे.

शुद्धीकरण एका क्षणातही करता येते, पण तसे करावयाचे नाही. कर्तव्य करत असताना आपले परके पहावयाचे नसते. आपले आहे त्याला विरोध कसा करू ही शंका आणावयाची नाही. ©️

You cannot copy content of this page