श्री समर्थ मालिक – मानवांची मनोभावना कशी तृप्त होते? दुसऱ्याचे ऐकून ती तृप्त होते कां? तर ती तृप्त होत नाही. जरी ते चंद्रावर गेले, तरी ते महासायासाने गेलेले आहेत. त्याही मानवांच्या अंत:र्यामी मीच आहे. पण यात मेख काय आहे? मानव मनाच्या आधीन होऊन चालला, मग त्याचे कोड कौतुक मला पुरवावे लागते. जास्त काही झाल्यास, मग मला काहीतरी करावे लागते. चंद्रावर गेले ते कोणत्या ठिकाणी गेले? त्या ठिकाणी गेल्यानंतर कोणत्या ठिकाणी फिरले? त्या ठिकाणी असणारे तत्व कोणत्या रूपात आहे हे पाहिले का त्यांनी? शेवटी काय घेऊन आले? तर दगड घेऊन आले.
मानव उन्मत्त झाल्यानंतर इच्छेला येईल ते करतो. पुढे काय होईल ते सांगता येत नाही. भारतीय लोक परदेशांचा गौरव करतात. पण पुढे काय घडेल हे सांगता येत नाही. पाताळात जाण्याचा प्रयत्न केल्यास तो कसा जाऊ शकेल? पृथ्वीचे दोन भाग करून जाऊ शकेल का? होते ते चांगल्यासाठीच होते. पृथ्वी हे एक तत्त्व आहे. तिला आकार आहे का? जमीन खोदली दिली तर जमीन परत मिटते का नाही? खोदलेली जमीन आपोआप मिटते. म्हणजे आजूबाजूची माती कोसळते. पृथ्वीने पोकळ जागा ठेवली आहे का? जगात महान तत्व आहे. त्याच्या अधिकाराप्रमाणे वाटचाल करते. जो सताचा उपासक म्हणजे जातीचा असेल त्यांनीच ती गती घ्यावयाची. आदीअंता पासून महान ज्ञानी सत् पुरुष यांना प्रतिसृष्टी निर्माण करण्याची ताकद होती, त्याना ती शक्ती होती. जरूर होती. मग हल्लीचा यत्किंचीत मानव चंद्रावर वस्ती करण्याचा प्रयत्न करतो त्यात विशेष ते काय? ©️
