Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

सद्गुरु ही काय चीज आहे…©️

सद्गुरु ही काय चीज आहे…©️

श्री विठ्ठल – सद्गुरु चलाख नसतील तर….सद्गुरुंना भोळसट करणारे तत्त्व दुसरे कोणतेही नाही. चलाख बनविणारेही तत्व नाही. ते स्वयमेव तत्व असल्यामुळे ते स्वयमच चलाख आहे. सत् चलाख आहे म्हणूनच सेवेकऱ्यांना अनुभव देता येतो. सेवेकऱ्यांना प्रत्यक्षात अनुभव दिलेला आहे. थोडे या ठिकाणी स्थिर झालेले आहेत. ज्या सेवेकऱ्यांनी सद्गुरु चलाख आहेत, हे अनुभवलेले आहे, त्यांना दहशत आहे. अजून अज्ञानाचे पांघरूण घेऊन राहिलेले आहेत, ते पांघरूण दूर सारतील त्याच वेळेला कळेल, सद्गुरु ही काय चीज आहे?

हल्लीचा काळ असा आहे की परमेश्वर वेगळा आहे तो कसा पाहता येतो हे माहीत नाही. सद्गुरुंना समजतात की ते आपल्या सारखाच मानव आहे. ही मानवांची भूमिका आहे. ती सुधारण्याचा प्रयत्न करावा. सद्गुरु ही काय चीज आहे हे कळले नाहीतर ध्यान कसे करणार? ज्याला याचा गंधच नाही तर कपाळी टिळा लावीलच कसा? गंध हे काय आहे हे ओळखले म्हणजे तो टिळा लावून शुद्ध बनतात. नुसता टिळा लावून शुद्धत्त्व होत नाही. सद्गुरू ज्यावेळेला त्याला टिळा लावतील, तेव्हाच तो शुद्ध (अनुग्रहित) होईल. वाटचाल करील. तो तरी वाटचाल करणारा कोण? सद्गुरु त्याला दाखवितात, फिरवतात. मी पाहतो, मी अनुभवतो. दाखवतो कोण? फिरवतो कोण? हे जोपर्यंत कळले नाही, तोपर्यंत अज्ञानात आहे असे म्हटले पाहिजे. ©️

You cannot copy content of this page