Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूंबद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व दिसणार …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु हे दयाघन तत्व आहे. ते सर्वस्व विसरून आदेश देतात. सेवेकर्‍याला प्रसंगातून सोडवून मार्गस्थ करतात. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – हे मना तुझ्या ठिकाणी सद्गुरूंबद्दल का सद्भावना निर्माण होत नाही? माझ्या सद्गुरूं बद्दल, हे मना …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

भक्ती हा एक महान राजमार्ग…©️

भक्ती हा एक महान राजमार्ग…©️

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सत भक्ती हा एक महान राजमार्ग आहे. तेथे काटे, खाचखळगे, खड्डे काहीही नाहीत. इतर मार्गांप्रमाणे हा मार्ग नाही. हा अत्यंत साधा सोपा सरळ मार्ग आहे, पण दोन्ही टोके सांभाळायची.

आपण जाणताच हाताच्या बाजू दोन, एक उजवी अन दुसरी डावी. त्या दोन बाजूंमध्ये उजवा गट भक्ती आणि डावा गट तामस, हटयोग, प्राणायाम. ही तामस लोकांची भक्ती आहे. तंत्र-मंत्र, ऋद्धी-सिद्धी ही सर्व तामस लोकांची उपासना. भक्ती युक्त उपासना कोणती तर अखंड नाम! त्यापरते दुसरे काही नाही. जे सतपदाचे अखंड नाम सतपदाच्या आसनावरून बहाल केलेले आहे त्याचेच नामस्मरण करणे आणि त्यांच्याच दर्शनात दर्शन युक्त राहणे, हेच त्याचे मर्म!

अशा स्थितीत राहिले ते ऋषीमुनी, ब्रह्मऋषी, सप्तऋषी आणि त्यांची गुरुकुले! अन यात चौकट मुनींची – कोपीष्ट मुनींची, तामस मुनींची गुरुकुले त्यात होती – शुक्राचार्य, दुर्वास, विश्वामित्र अन त्यांची गुरुकुले, राक्षस, अघोर – ज्यांना संजीवनी मिळाली होती. ही वेगळी चाकोरी आणि भक्ती ही वेगळी चाकोरी! तामसी वृत्तीच्या लोकांचा ताफा मोठा होता. त्यांच्या बाजूला भरपूर अघोर होते. परंतु ब्रह्मर्षी, सप्तऋषी यांचा ताफा मात्र लहान होता, परंतु तेजस्वी होता. तेजोबलासहित होता. याचे कारण सत कोणाच्या बाजूला होते तर सात्विकांच्या! सत त्यांनाही (तामसी वृत्तीच्या लोकांनाही) सांगत असे की मी तुमच्या बरोबर आहे. कारण दोन्ही प्रवृत्ती सत आणि तामस, असलेले लोक हे त्यांचे भक्त होते. दोन्हीही सताचेच भक्त. तामसी लोकांची विपरीत बुद्धी तर सात्विकांची सरळ बुद्धी! म्हणजेच भक्तीचा मार्ग साधा सरळ पण राजमार्ग!…©️

You cannot copy content of this page