Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूंबद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व दिसणार …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु हे दयाघन तत्व आहे. ते सर्वस्व विसरून आदेश देतात. सेवेकर्‍याला प्रसंगातून सोडवून मार्गस्थ करतात. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – हे मना तुझ्या ठिकाणी सद्गुरूंबद्दल का सद्भावना निर्माण होत नाही? माझ्या सद्गुरूं बद्दल, हे मना …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

दगडाची मूर्ती काही करते का हो?…©️

दगडाची मूर्ती काही करते का हो?…©️

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज –

मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल कर. बरेच जण देवळात जातात, कोणी लोटांगण घालून घेतात तर कोणी जोरजोरात घंटा नाद करतात आणि आपली देवावरची श्रद्धा, भक्ती दाखवण्याचा प्रयत्न करतात. परंतु देवळातली दगडाची मूर्ती काही करते का हो? परंतु जागृत मूर्ती मात्र सर्व काही करते. आत वास करणारे म्हणते,” अरे जे काही करतोस हे सर्व तू करतोस.” त्यावेळी ते तुझ्यात वास करणारे आहेत त्याची तू जाण घेतोस का?

काही लोक आपण पाहतो की कपाळाला गंध टिळे लावून स्वतःला पांडुरंगाचा सेवेकरी म्हणवतात आणि भजने, कीर्तने करतात. परंतु तुम्हीच सांगा अशाने पांडुरंग प्राप्त होतो का? आणि हे करत असताना तुमचे आतले मन स्थिर राहू शकते का?

अरे, बाह्य अंगाने निरनिराळे वेश परिधान करून आपले मन स्थिर राहू शकेल का? अरे, आत वास करणाऱ्या सताचा, सद्गुरूंचा माग तुम्ही काढू शकणार आहात का? तुमच्या मनाची एवढी कुवत आहे का? काही सेवेकरी दरबारातून घरी गेल्यानंतर सद्गुरूंबद्दल काही प्रणव काढतात, त्यांना वाटते सद्गुरु आपल्या बरोबर नाहीत, त्यांना थोडेच कळणार आहे? यातच खरी मेख आहे…©️

You cannot copy content of this page