श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकऱ्यांनो तुम्हीच सांगा भक्त आणि भगवंत एक आहेत का हो? जर भगवंतच भक्ताच्या हृदयात वास करीत आहेत तर ते वेगळे असू शकतील का? परंतु आम्हाला काय वाटते “भगवंत वेगळा आणि मी वेगळा”.
आपल्यात ते वास करणारे जे अविनाशी तत्व आहे त्यालाच आत्मा म्हणतात. आपणाला कल्पना आहे की जर अद्वैत गती प्राप्त करायची असेल तर मनाची ठेवण सत शुद्ध पाहिजे. जर तो हेतूरहीत असेल तर त्याला आत्मज्ञान प्राप्त होते म्हणजे शुभ्र प्रकाश तो पाहू शकेल. परंतु मन जर हेतू रहीत नसेल तर आत्मज्ञान होणे दुरापास्त आहे.
आपले सेवेकरी याची जाण घेत नाहीत की आपले सद्गुरु आपणाला तळमळीने परमोच्च गतीपर्यंत समजावून सांगतात पण ते ऐकायचे आणि सोडून द्यायचे. ”मी तू रहित होणे म्हणजेच सतमय होणे, म्हणजेच सद्गुरुमय होणे”. आता आपल्याला सद्गुरूंनी तळमळीने आपल्या सेवेकर्यांना अमृत पाजले तर ते अमृत प्राशन करून सेवेकर्यांनी शक्तिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु सेवेकरी काय करतात जिथे ऐकतात तिथेच सोडून मोकळे होतात. ©️
