Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूंबद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व दिसणार …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु हे दयाघन तत्व आहे. ते सर्वस्व विसरून आदेश देतात. सेवेकर्‍याला प्रसंगातून सोडवून मार्गस्थ करतात. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – हे मना तुझ्या ठिकाणी सद्गुरूंबद्दल का सद्भावना निर्माण होत नाही? माझ्या सद्गुरूं बद्दल, हे मना …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

हे कोण जाणू शकेल?©️

हे कोण जाणू शकेल?©️

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. ते जाणणे कठीण, तुकाराम महाराज म्हणतात ना, “तेथे पाहिजे जातीचे। येऱ्या गबाळ्याचे काम नोहे ।।”

पण जो भक्त, जो सेवेकरी हे साधू शकेल, ज्याचे मन सद्गुरुंबद्दलच्या भावनेने ओथंबलेले असेल तोच हे जाणू शकेल. काही भक्त आपल्यावर प्रसंग आला की धावत येतात. इतर वेळी टंगळमंगळ करतात. अशी जर भक्ती असेल, भावना असेल तर हृदयस्त विराजमान असलेल्या सद्गुरूंनी तरी काय करावे?

प्रवचन करीत असताना थोडेबहुत टोकले हे पाहिजेच. परंतु सद्गुरु माऊली दयाघन आहे ते त्यातूनही भक्ताला मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतात. सद्गुरु कसे आहेत तर अति विशाल, अति शांत, अति कोमल! भगवद गीतेत कृष्णांनी अर्जुनाला सांगितले, “नाचतो मी तेथे भावो। ना भावो विद्यते सता ।।…©️

You cannot copy content of this page