Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

अंध:कार दूर सारा…©️

अंध:कार दूर सारा…©️

श्री समर्थ मालिक – सर्वस्व भारतभूमीवर अंध:काराची छाया पसरलेली आहे. सर्वस्व अंध:कार दाटला आहे. याचे कारण कारभार आहे. सेवेकरी जे स्वयं प्रकाशात नांदतात, त्यांनी चिंता करावयाची आवश्यकता काय? त्यांनी चिंता करावयाची नाही.

आज जवळजवळ किती वर्षे हे चालले आहे? आराखड्याची माहिती अजून दिली नाही आणि मिळणारही नाही. हे तुम्हाला माहित की मला माहित?

यज्ञ चेतवणार असले तरी त्यांची मुदत असेल की नाही? किंवा ज्याने यज्ञ चेतवला त्याला तरी माहीत असेल की नाही? मग पाहू या पुढे !

ज्याला सत् भक्तीचे ज्ञान कळत नाही, तो यज्ञच चेतवणार. ज्याला सद् भक्तीचे ज्ञान कळले आहे, तो ढुंकूनही यज्ञाकडे पाहणार नाही. स्वयम् अखंड यज्ञ हृदयात तेवत आहे, पण त्याला शांत करण्याचे सामर्थ्य यांचे जवळ नाही. मग बाहेरचा यज्ञ काय शांती करणार? स्वयम् यज्ञाला स्वाहाकार मिळाल्याशिवाय तो शांत होणार नाही. जो अग्नी, यज्ञ तेवत आहे तो भक्षाकरता भुकेलेला आहे. तो वाट पाहत आहे. मग तो कोणाचे भक्ष करणार? अन् कशासाठी?

मानवांच्या मनाची मनोभावना बदलली आहे. मुलगा पित्याला पिता म्हणावयास तयार नाही. इतका मानव पुढे गेलेला आहे. त्यासाठी जे घडणार आहे ते घडणार, यात संदेह नाही. ©️

You cannot copy content of this page