Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

माझे शास्त्र कोणाला सापडले आहे का? ©️

माझे शास्त्र कोणाला सापडले आहे का? ©️

श्री समर्थ मालिक – माझे शास्त्र कोणाला सापडले आहे का? हा मृत्यू गोलार्ध आहे. यात जडत्व मानव आहे. त्यात अखंड तत्त्वाचा वास आहे.

अखंड म्हणजे काय? अन् खंड म्हणजे काय? मग खंड निर्मिती कोणापासून झाली? अखंड पासूनच खंड निर्माण झाला. त्यांनी फेकून द्यावयाचे ठरविले, मग कुठे फेकून देतील हे सांगता येत नाही. म्हणून खंडाने ही धडपड चालविली आहे.

या ठिकाणी जे चालते ते इतर ठिकाणी चालत नाही. मानव व त्याचे कर्तव्य हे प्रथम त्याने शोधावे. मानवाने सत बनण्याचा प्रयत्न करणे. सत बनला की मानवता समजेल. तदनंतर सताची गती ! त्याला सताची गती मिळाली कि मगच तो शरण जाण्याचा प्रयत्न करतो. शरणागत गेल्यानंतर सर्वस्व दिशा त्याला दाखवावी लागते.

त्या मानवाजवळ त्रिवेणी संगम असला पाहिजे. मग भगवंताला पाहण्याची महान इच्छा अवश्य प्राप्त होते. मग त्याला जवळ घ्यावे लागते. तो त्या ठिकाणी पूर्णत्वाने लीन होतो. त्या सताने त्याला तिथपर्यंत नेऊन घडवले तरी त्याला सांगता येत नाही. “अखंड” खंडाला तिथपर्यंत नेऊ शकते. म्हणूनच हे खंड दृश्य आणि अदृश्याचे खेळ आहेत. जे अखंड आहे, ते दृश्य आणि अदृश्याचा खेळ करून बाजूला असते. खंड जे आहे त्याची मनोभावना मर्यादित असते. म्हणून तो फसला जातो. त्याच्या संचितात नसेल तर अपेक्षेप्रमाणे मिळेल कसे? तर मिळणार नाही. सेवेकर्‍याला वर पाठवायचे असेल तर अर्धसमाधी कंठापर्यंत असते. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page