श्री समर्थ मालिक – मागील आदेशाप्रमाणे वरचेवर घडत आले आहे यात शंका नाही. येथून पुढे काय होईल हे सांगता येत नाही. उ:षापाचा काळ संपत आला आहे. आणखीन काही दिवस त्रास होईल, पण सेवेकर्यांनी बिलकुल घाबरू नये. तिजोरी दिली आहे, तिची जोपासना करणे.
हल्ली ठिकठिकाणी अनुभव मिळत आहे. संकटाच्या वेळीच मानवांना माझी आठवण होत असते. सुखी असले तर हजार दैवते पुजतात. पण दु:ख झाल्यावर अखेरीस माझी आठवण होते. तो आठवण करतो. इथून पुढे फारच दिवस कठीण आहेत. ते पहाल, सांगू शकाल. मात्र जे कर्तव्य आहे ते चालूच राहील. यात न्यूनता होणार नाही. सेवेकऱ्यांनी चिंता करावयाची नाही. एकातरी वेळेला त्यांनी निर्धास्त राहावे. मात्र दिलेली तिजोरी चोख ठेवण्याचा प्रयत्न करणे.
मी एकाच नामातीत आहे यातील अर्थ आपण ओळखावा. आरतीचे वेळेला सर्व सेवेकरी ललकारी म्हणतात, तिचा अर्थ सेवेकऱ्यांनी केला तर कळेल.
ॐ कार बीज मात्रेन नित्यं ध्यायंती योगिन: | कामदम् मोक्षदम् चैव ॐ काराय नमो नमः || हा कोण याची ओळख करून, स्वतःची दृष्टी हि तेजोमय करून योग्याला पाहण्याचा प्रयत्न करा. तो योगी कुठे आहे, हे सेवेकर्यांनी विसरता उपयोगाचे नाही. सर्वस्व सांगितले तरी, सेवेकऱ्यांच्या लक्षात राहील कि नाही कोण जाणे? पण मायावी लगट लवकर ध्यानात राहते, म्हणून होते ते चांगल्यासाठीच होते. काही सेवेकरी आपल्या कर्तव्यात तल्लीन होते. तत्वापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे. सेवेकऱ्याला पाहता आले नाहीत तरी क्षमा आहे. सेवेकऱ्याने एकाच तत्वाने आपल्या प्रकृतीचा उजाळा करणे हे संदेश आहेत. दिलेली तिजोरी भरपूर झाली की प्रकृतीचा उजाळा लवकर होतो. ©️
