Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

नाही वैकुंठीचे ठाई | ©️

नाही वैकुंठीचे ठाई | ©️

श्री समर्थ मालिक – नाही वैकुंठीचे ठाई | नाही योगीयाचे हृदयी || माझे भक्त गाती ठाई ठाई | तेथे तिष्ठामी नारदा ||

आताचे भक्त आहेत त्यांना नारदा सारखे सर्वस्व बहाल करावे का? अन् ते नारदा सारखे होतील का? नारद ही साधी सुधी ज्योत नाही. त्याचा तंबोरा याच आसनावर घेतलेला आहे नाश?

भक्ती का करावी? नारदाने का, कशासाठी, कोणती भक्ती केली? तर निष्काम भक्ती त्याच्याकडून झाली. अन् नारदाने भगवंत हे तत्व कुठे आहे ते पाहिले. ते पाहिल्या नंतरच नारदाने असे म्हटले आहे. नारदाप्रमाणे तुम्ही मानव कराल का? तुकाराम, रामदास, ज्ञानेश्वर आदी संतांनी केले.

आपण अनेक वेळेला सांगता पण ते तत्व, ते संत ज्या नावाने चालले होते, तेच नाम तुम्हाला पण बहाल केलेले आहे. तेव्हा मनोमन भक्ती करून, ते तत्व कोणत्या ठिकाणी तटस्थ राहिले आहे याची ओळख तुम्ही करून घेतली आहे का? पुराणातले तुम्ही सांगता, पण प्रत्यक्षात काय घडण घडली आहे याचा शोध तुम्ही करा. तुकाराम नामदेव आदी संतांनी काय केले, ते सांगा. ते तटस्थ असणारे तत्त्व लांब नाही. तुमच्यात अन् त्यांच्यात तेच तटस्थ आहेत. तेच आपणाला आसनावरून दिलेले आहे. पण कोणी केलेले नाही, कोणी करीत नाही. म्हणून भक्तीचे वळण दिलेले आहे. भक्ती युक्त शुद्ध गतीने जाईल अन् तोच स्वतः माणूस त्या मार्गाने निघाला तरच त्याला मनुष्य म्हणतात आणि मनुष्य म्हटल्यानंतर तोच ईश्वर आहे. हेच नारदांनी, सर्व संतांनी सांगितले आहे. तुम्ही नाही कमविले तरी संत होऊन रहा. शांत रितीने राहा. ©️

You cannot copy content of this page