Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

अघोर हे निपटणार ! ©️

अघोर हे निपटणार ! ©️

श्री समर्थ मालिक – सत् आणि असत या दोन्हींचे घर्षण होऊन सतावर असणारे असताचे दडपण दूर करण्याकरिता काही तरी केलेच पाहिजे. असताचा नाश करताना सताला थोडीशी झळ लागेल. ती सहन करण्याचा प्रयत्न करावा. अघोर निपटल्याशिवाय महाराष्ट्र शुद्ध होऊ शकत नाही. इतकेच काय, मानवाला एक पाऊल टाकल्यानंतर दुसऱ्या पावलाला काय करतो हे कळत नाही. बोलायचा ताळमेळ नाही. गरीबांकडे तर बिलकुल लक्ष नाही. अघोर आपल्याच तालात नाचत आहेत. त्याच्यासाठी काही आणखीन लाटा येतील. यातून महान तपस्वी येऊन त्याने काही जरी केले, तरी हे घडून घ्यावयाचे ते घडवून घेणारच. म्हणून सहनशिलता ठेवा. अखंड तत्त्वाच्या कृपेने संरक्षण करण्याचा प्रयत्न करा.

घघअघोर हे निपटणार ! निपटणार ! निपटणार !! पूर्णत्वाने अघोर निपटता येणार नाही, पण बऱ्यापैकी निपटले जाईल. अघोरांनी थैमान घातल्यानंतर अवतार कार्याची वेळ येऊन अघोर निपटले जाते. थोड्याच काळात ते निपटले जाईल. तिकडे ज्वालामुखी वाट पाहतच आहे. त्यासाठी आसनावरून आदेश सोडले जातील.

मागे चत्वार खाणीची चिंता आपणास पडली होती. म्हणून जरा गोंधळ झाला होता. पण आता कर्तव्य करून घेणारच घेणार, हे सेवेकऱ्यांना संदेश देणे. निसर्गाच्या लाटा येणार आहेत, शिवाय युद्धाचा भरोसा नाही. झालेच तर महान युद्ध होण्याचा संभव आहे. नाहीपेक्षा थोडक्यात होईल. ©️

You cannot copy content of this page