Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

आकाराशी संधान बांधल्या शिवाय…©️

आकाराशी संधान बांधल्या शिवाय…©️

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल.

या दरबारातील सेवेकरी अप्रकाशित नाहीत. अप्रकाशित म्हणावे तर ते बसल्यानंतर रममाण होतातच ! म्हणून अप्रकाशित म्हणता येणार नाहीत. पण जी गती पाहिजे, ती अजून मिळालेली नाही.

कांही सेवेकर्‍यांनी पाठीमागे विचारले होते की, आसनाला स्थूल अधिकार कां नसावेत? असे प्रणव निघालेले आहेत. हे आत्ताच कळणार नाही. वेळ आल्यानंतर आपोआप कळेल. दिसण्यात येईल. स्थूल अधिकार नाहीत म्हणावेत तर रंजल्या गांजलेल्यांची कार्ये किती झाली आहेत? स्थूल मानवावर कर्तव्य करून त्यांना मुक्त केलेले आहे की नाही?

रामावतारात स्थूलावर कर्तव्य होत होते. कृष्णावतारात अचेतनाला चेतनामय करून कर्तव्य करून घेतले. आता सूक्ष्माचे कर्तव्य करून घेत आहे. या सूक्ष्मावरून स्थूलावरचे कर्तव्य आपोआपच होणार आहे. हल्ली काय होत आहे, ते सर्वस्व कळत आहे. म्हणून जे होत आहे ते पहात रहा. तुकारामांच्या बोलावरून आपण शरण गेलात की नाही ! याचे विवेचन आपणच करा. ©️

You cannot copy content of this page