Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

सत् कोण हे ओळखावे…©️

सत् कोण हे ओळखावे…©️

श्री समर्थ मालिक – वेद अनंत बोलीला | अर्थ इतकाच काढीला || निजनिष्ठे नाम गावे | शरण विठ्ठलासी जावे ||

वेद म्हणजे काय? हा किती तऱ्हेने सुटतो? बोलाचा अंत सापडला आहे काय? बोल, प्रणव कोठून सुटतात?

चैतन्याची घुसळण झाल्याशिवाय वेदना नाही. वेदना झाल्यानंतर प्रणव सुटतात, ह्यालाच वेद म्हणा अगर काही म्हणा ! हे कोठून, कसे, कोणत्या तऱ्हेने सुटतात याचे विवेचन कोण करतो? हे कशासाठी होते? याचा आचार विचार ज्याने जाणला, त्यानेच जाणला. इतरांना याचे कोडकौतुक वाटत नाही. ज्याला वाटते, त्याने आपल्या हृदयात साठवावे. ज्याने हे जाणले, त्याने पूर्ण कवटाळून ठेवले. मग विठ्ठल म्हणा, पांडुरंग म्हणा, स्वयंभू म्हणा, काही म्हणा असे मानवाचे आहे. पण जो सत् तत्त्वात गुंगला, त्याची कृती बघा अन अहंकाराने मायावीत गुरफटलेला मानव बघा. त्या दोघात किती अंतर पडते? बोलाचा किती फेरफार होतो?

वेदना निर्माण झाल्यानंतर प्रणव सुटतात, पण सत् आणि मायावी प्रणव यात बराच फरक असतो. बोल बोलवितो कोण? हे ज्याने ओळखले त्यानेच ओळखले. ज्याने ओळखले नाही तो म्हणतो, “मीच शहाणा आहे.” पण मी मायेला किती मारून, त्याच्याकडून भरपाई करून घेत असतो. ©️

You cannot copy content of this page