Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूंबद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व दिसणार …

मी कुठे आहे?…©️

मी कुठे आहे?…©️

श्री समर्थ मालिक – भक्त भगवंताचे ठाई अन् भगवंत भक्ताचे ठाई असतात. मी कुठे आहे? हे या यत्किंचित मानवांना काय कळणार? मी नाही आकाशी, मी नाही पाताळी. कोण माझा शोध घेणार आहे? जो भक्त आहे, तोच माझा तपास करू शकतो. अघोर कधीही माझा शोध घेऊ शकणार नाहीत.

बरेच दिवस आसनाधिस्तांचा अन् माझा वाद चालला आहे. मी चाल ढकल करीत होतो, पण आता मात्र डोक्यावर ओझे आहे. थोडे संयमन आहे. हे ओझे माझ्यावर जास्त झाले, तर ही धरा सुद्धा स्थिर राहणार नाही. हलणार आहे. मात्र शांत रहा. शांती हिच कामाला येते. ज्या सेवेकरीणीला त्रास दिला, तिच्या चरणांवर लोळायला लावीन. नाहीतर मी सत नव्हेच ! त्या सेवेकरीणीसाठी आसन, आसनाधिस्त जितके तळमळत आहेत, तितकाच मी देखील तळमळत आहे. अघोर मानवांना तोंड देऊन आसनाच्या कर्तव्यासाठी जागत आहे. ठीक आहे, माझ्याशी गाठ आहे.

स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही ताळात माझे लक्ष असते. भक्ताच्या ठिकाणी लक्ष असते. मी निराकारी असतो तर कोणी पाहिले नसते. आकारातच माझा वास आहे हे सेवेकऱ्यांनो लक्षात ठेवा. नाही पेक्षा तुमच्यासारखे अभागी तुम्हीच ! पूर्वजन्मीच्या संचिताप्रमाणे सानिध्यात घेतले आहे. आसनाधिस्त म्हणतात, मला या ठिकाणी का फेकले? कारण अघोर मानवांचे शुद्धीकरण करावयाचे होते. काही ज्योतींना सानिध्य द्यावयाचे होते म्हणून त्या ठिकाणी आसन टाकले आहे. थोड्या दिवसात आपणास सर्वस्व समजेल. (समाप्त)©️

You cannot copy content of this page