Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूंबद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व दिसणार …

सेवेकरी जसा पाहील…©️

सेवेकरी जसा पाहील…©️

श्री समर्थ मालिक – सेवेकरी जसा पाहील तसा त्याला अनुभव देणे होत असते. त्या तऱ्हेने सेवेकऱ्याने पाहिले असेलच. असे कोणी पाहिले आहे का? सेवेकर्‍याची मनोबुद्धी जशी जाईल तसा त्याला अनुभव द्यावा लागतो. इतकेच की, मन शुद्ध सात्विक स्फटिका सारखे पाहिजे, मग त्या ठिकाणी त्याचे सूक्ष्म खडे असते. ध्यान कोणाचे करावे हे त्याने ओळखावे.

मी कसा आहे कळणार नाही. आकारी आहे की निराकारी आहे. निराकारी आहे, तर प्रणव निघतात कुठून? बोल निघतात कुठून? मग आकारातच मी आहे अन् आकाराच्या रहितपण मी आहे. म्हणून प्रथम काय आहे, कशासाठी आहे, काय करावयास हवे हे सद्गुरु दाखवितात. पण सेवेकर्‍याची भ्रमंती असते. ती दूर करून गती जरी दिली, तरीही हे सत्य आहे का मिथ्य आहे? पाहतो आहे खरे, असे दिसत आहे. प्राकृत दृष्टीने पाहता येते. इतकेच की, सेवेकऱ्यांनी त्या तऱ्हेने कर्तव्याची दिशा वाढवीत नेली की हे सुद्धा कळेल. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page