श्री समर्थ मालिक – हल्लीच्या मानवाला परमेश्वर जगात आहे की नाही त्याची भ्रमंती आहे. जगात ईश तत्व वावरते हे दाखविण्यासाठी तसेच अघोर तत्त्वाला तोंडघाशी पाडण्यासाठी, त्याला काही ना काही करावे लागते. त्यांनी लवकरात लवकर कार्य करावे ही अपेक्षा आहे.
डोळे नसतात त्यामुळे अंध:कार निर्माण झाल्यानंतर मर्यादा तुटली जाते. तत्त्वाने डोळे झाकपणा केल्यानंतर सेवेकरी संतप्त होतो, पण संतप्त न होता गोडीने तत्वाशी झगडणे हे अवश्य कर्तव्य आहे. कारण सत् हे कशाचे प्रिय आहे? तर सताचेच प्रिय आहे. मग लिनतेत, नम्रतेत, तुम्ही काहीही म्हणा, इतके लवचिक प्रेम मर्यादित असते ते धीर गंभीर असते. त्यांनी दुर्लक्ष केले तर त्रास होतो. म्हणून गोडीने घेतले पाहिजे. गोडीने मायेने घेतले तर मात्र ते तत्व हवे म्हटले ते देण्यास तयार असते.
हे तत्त्व जे आहे, ते सारखे पाहते आहे. ऐकते आहे. सर्वस्व लक्ष इकडे आहे. ऋषी मुनींनी देखील त्यांची भक्ती केली होती. आत्ता काय आरडाओरडा गोंधळ होतो. भीतीने भक्ती होणार नाही.
आपणाला माहित आहे, काही यात्रेकरू पंढरपूर, काशी अशा ठिकाणी जातात. काशीला जातात स्वयंभू आहे, पंढरीला जातात विठ्ठलाचे दर्शन होण्यासाठी. असे जर आहे तर त्या ठिकाणी रोगराई का निर्माण होते? पण विठ्ठलाला कोणी पाहिले आहे का? ©️
