Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूंबद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व दिसणार …

मार्गावर आणण्या करीता …©️

मार्गावर आणण्या करीता …©️

श्री समर्थ मालिक – सेवेकरी असून कर्तव्याची दिशा चुकला गेला तर आसनाने, आसनाधिस्तांनी वशिला लावू नये. ज्योत सात्विक असते पण मनाचे आधीन झाल्यानंतर रस्ता चुकते. तेव्हा त्याला मार्गावर आणण्या करीता चुणूक ही दाखवावी लागते.

या २०-२५ वर्षाचे काळात चमत्कार, नमस्कार कितीतरी दाखविले आहेत. ज्यांनी हे चमत्कार पाहिले, त्यापैकी किती ज्योती या ठिकाणी रममाण झाल्यात, स्थीर झाल्यात? पण रममाण कोणाला करून घ्यावयाचे आणि कोणाला नाही?

अन् हीच स्थिती कोकण आश्रमात झालेली आहे. तेथील मानव मतलब साधण्यासाठीच सेवेकरी झालेले आहेत. फक्त एकच ज्योत सोडून बाकी ज्योती जागृत आहेत का? काही मुंबईत आता का आल्या त्याची कल्पना आहे. ज्या कर्तव्यासाठी संदेश सोडले, त्या कर्तव्याचे पालन झाले आहे का? मानवी पुराव्यासाठी मला तिकडे जावे लागेल म्हणूनच ते इकडे आलेले आहेत.

या सबंध वालावल भूमीमध्ये ज्यांनी आसनाची विटंबना केली, ते सूटणार नाहीत. केव्हा आणि कधी? आसनाचे खोटे नाटे, इकडचे तिकडे कोण करीत आहे हे पण मला माहित आहे. त्यांना सोडणार नाही. सेवेकर्‍यांनी वर दाढी धरावयाची व खाली पायाने तुडवावयाचे मग दर्शन घेण्याचा अर्थ काय? मतलब साधण्यासाठी? पण तो मतलब साधू देणार नाही. या मानवानां त्राही त्राही करून सोडेन. एकच ज्योत, तिच्या कर्मसंचिताप्रमाणे होईल. पण तिच्या कर्मसंचिता पेक्षाही उज्वल ठिकाण मिळवून देईन. मानवाने काय कमवायचे? तर सत् कृती ! ज्याने सत् कमावले, त्याचा केसही वाकडा करू देणार नाही. जो माझ्यात रममाण होतो, मीही त्या ठिकाणी रममाण होतो. ©️

You cannot copy content of this page