Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूंबद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व दिसणार …

सद्गुरुं शिवाय कोणतीही…©️

सद्गुरुं शिवाय कोणतीही…©️

श्री समर्थ मालिक – यात काही कमी नाही, रिते नाही, पण सेवेकरी ओळखणारा पाहिजे. प्रकृतीचे खेळ आहेत. ते अतोनात चंचलयुक्त असतात अन् म्हणून ते भिन्न आहे. ज्या वेळेला प्रकृती अभिन्न होईल, त्याच वेळेला सद्गुरु व त्यांची लिला याची गती मिळेल.

मी सर्व भूतेषु पश्य आहे असे निवेदन आहे आणि असे काही सेवेकऱ्यांच्या आढळण्यात आले असेल. प्रकृती स्वयमेव आहे, प्रकृती जन्म धारण करते असे आढळले आहे का? मग अनंत रूपे, अनंत नामे असे जे म्हटले आहे, ते कोण नटले आहे?

मला नाही चरण, नाही नाक, नाही कान, नाही डोळे, नाही तोंड पण बोलतो. फार सुंदर पाय नाहीत, पण चालतो. मी सर्वव्यापी आहे. स्थूल देही आहेत, त्या स्थूलाचे व्यवहार कोणाच्या सत्तेने चालतात? जर सद्गुरु कृपेने सर्व चालते, मग तुझे माझे का होते? म्हणून जोपर्यंत अज्ञानपणा जात नाही, तोपर्यंत सद्गुरु चरण तीर्थ प्रगटणार नाही.

सेवेकरी म्हणतात ही प्रकृती आहे, पण ती कोणाच्या आधीन आहे? ती कोणाच्या स्वाधीन आहे? ती प्रकृती केव्हा फेकून देतील याचा थांगपत्ताही लागू देणार नाहीत. ते बाहेर केव्हा पडतील, हे कुणीही सांगू शकत नाही. ती प्रकृती चांगली असल्यास, ती राहण्याकरता मानव वैद्यकीय उपचार करतात, पण बाहेर पडावयाचे असेल तर औषधोपचार करूनही ते बाहेर पडतातच नां? मग नाराज जे होते, ते कोण होते?

ज्या ठिकाणी अज्ञान आहे, त्या ठिकाणी काही कळणार नाही. ज्याची प्रकृती सतशुद्ध आहे, त्यानेच हे ओळखले. सद्गुरु शिवाय कोणतीही हालचाल होत नाही. त्यांच्या कृपेशिवाय कोणीही हालचाल करू शकत नाही. हे समजले, मग राहिले काय? होते काय? एवढी गती जर सेवेकर्‍याला असेल तरच समजेल. ©️

You cannot copy content of this page