श्री स्वयंभू महेश – भगवंताने आकार मानव रूपातच घेतला आहे. काही कुर्म, वराह सुद्धा अवतार झाले आहेत, पण मानवात अवतार घेऊन त्याने जागे केले तरी तो मानव निद्रिस्तच आहे. हे फक्त प्रकृतीचे चाळे आहेत. प्रकृती अंगाने सेवेकर्यांनी जाऊ नये. ही माझी इच्छा आहे. प्रकृती भिन्न आहे म्हणून सांगत आहे.
भिन्न भिन्न प्रकृती | कर्मभेदे दिसती || प्रकृती भिन्न आहे. मानवाने विचाराने त्यांना नावे ठेवली आहेत. विचार आणि प्रकृतीला शुद्ध, अशुद्ध बनवले आहे. जर शुद्ध विचार असता तर हा वाद निर्माण झाला नसता. रंग भिन्न असेल पण तो प्रकृतीचा आहे. शिवू नको, विटाळ होईल. हे कोण म्हणते? तर प्रकृती !
मनाने अशुद्ध विचार करतो असा जो मानव आहे त्याला भगवंत सापडला आहे का? जाणणारा असेल तर त्याला हे सर्व एकच आहे. मानवाचे मन फिरते, त्याप्रमाणे मानव फिरतो. मानव त्रिगुणांची उपासना करतात. कोणी विष्णूची, कोणी शंकराची ! म्हणून प्रकृतीचा वाद लागतो. मी सर्वस्व पहात असतो.
भांडते ते अज्ञान भांडते. अज्ञानामुळेच जन्म कर्म होते ! ज्याला स्वयम ज्ञान आहे तो केव्हाही फसणार नाही. आज स्वयमेव शिवाची रात्र आहे. एकच, ॐ कार तत्त्व सर्वभूतेषु पश्य आहे. ते तत्व आहे. आकारात आहे म्हणून पाहता येते. आकारात नसेल तर कोणाचीही पाण्याची हिंमत नाही. (समाप्त) ©️
