Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूंबद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व दिसणार …

मानव कशाला फसतो…©️

मानव कशाला फसतो…©️

श्री स्वयंभू महेश – हल्लीचा मानव अतिशय अहंकारी झाला आहे. त्याला गुरुपद कळलेले नाही.

गुरुपद म्हणजे आकार आला. मानवाला त्याची सेवा करायला त्रासदायक होते, मग त्याला सद्गुरू चरण कसे सापडणार? ज्याला काही कळत नाही, तो उघड्या धोंड्याला शेंदूर थापून त्याला आकारात आणतो, त्याच्या पाया पडतो पण त्याला बोलता येत नाही. अशा गोल आकारी दगडाच्या पाया पडणारा मानव त्याला बोलत्या चालत्याचे दर्शन घ्यावयास लाज वाटते. असेच मानव आज आपण पहात आहोत. काय चालले आहे हे कळते आहे, पण मानव फसतो आहे.

मानवानेच आकार आणि मूर्ती बनवली. तिची स्थापना केली, पण त्याची व्यवस्था नसेल तर कुत्रा त्या ठिकाणी नीच कृत्य करतो त्याच्याच मानव पाया पडतो. अशावेळेस ईश्वर तत्व कुठे आहे हे त्याला कळत नाही. कुत्र्याने जरी नीच कर्म केले तरी त्यात देखील सत् आहे, पण पाहणाऱ्यालाच दिसेल, पण दगड अन् कुत्रा सारखाच का? पण जो पाहिल त्यालाच ते कळेल आणि तसे जो पाहिल तोच मानव श्रेष्ठ आहे. ©️

You cannot copy content of this page