श्री समर्थ मालिक – मनात तरंग येत असतील तर सद्गुरुंची आठवण करा. मी कोणाशी वादविवाद करतो, कोणाची मस्करी करतो, हे सेवेकर्यांनी करु नका म्हणजे आपुलकी लवकर निर्माण होईल.
आसनाधिस्तांनी कोडकौतुकाने सांगितले आहे सर्व माझेच आहेत आणि मी सर्वांचा आहे. अशा तऱ्हेने कर्तव्य केले तर कोण कोणाची विटंबना करेल काय? म्हणून मन मिळावूपणाने सेवेकऱ्याने वागावे. मन स्फटिका सारखे ठेवणे म्हणजे त्या ठिकाणी द्वैत भावना निर्माण होणार नाही. अशा तऱ्हेने वाटचाल करणे.
आज पर्यंत काही सेवेकऱ्यांची मनमिळाऊपणे वाटचाल झालेली आहे. सेवेकऱ्यांचा प्रश्न आहे, मग कर्तव्य सेवेकऱ्याचे असो अगर त्याच्या मुलामाणसाचे असो, मायावी तऱ्हेने सेवेकऱ्याने जे कर्तव्य करावयाचे असते, ते करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही सेवेकऱ्यांनी वाईट वाटून घेऊ नये. मात्र इतकेच आहे, दरबारातील सेवेकरी कोणीतरी हजर राहणारच, त्यातच समाधान मानावे.
कर्तव्याला जागृत राहणे हे संदेश आहेत. कर्तव्य काय आणि कोणते? तर या जन्मी काय केले पाहिजे याचे शोधन आपणच केले पाहिजे. सत करायचे ते याच जन्मी करा, म्हणून जे करावयाचे ते आत्ताच करा. आचरणात आणा. जे सांगितले ते बोल लक्षात ठेवून सारखे गिरवीत राहणे व त्यावर अंमलबजावणी करणे हेच संदेश आहेत. (समाप्त) ©️
विशेष सूचना : उद्या पासून श्री सद्गुरु माऊलींंची प्रवचने येथे देण्यात येणार आहेत, तरी समस्त भक्तगणांनी यांचा लाभ घ्यावा.
