Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

द्वैत अद्वैत भाव जाणा…©️

द्वैत अद्वैत भाव जाणा…©️

दिनांक:- १ जुलै १९७६

जया अंगी नाही द्वैत अद्वैत भाव । तेणे आत्मस्थिती जाणीतसे।

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – द्वैत म्हणजे हेतू, अद्वैत म्हणजे हेतू रहीत, अशी जी ज्योत असेल ती आत्मस्थितीचा अनुभव घेऊ शकते. अशी ज्योत आत्मस्थिती अनुभवते. अशी दृष्टी ज्या मानवाच्या मनाजवळ आहे तोच मानव अशा आत्मस्थितीचा अनुभव घेऊ शकतो, अशी स्थिती जाणून घेऊ शकतो.

मानव आत्मज्ञानी होईल हे मान्य आहे पण हेतूरहीत केव्हा होईल? हेतूरहीत झाल्याखेरीज मानव आत्मस्थितीचा अनुभव घेऊ शकेल का?तर शकणार नाही. पण मानव हेतूरहीत कधी होऊ शकतो? अहंकाररहीत झाल्यानंतर मानव हेतूरहीत होऊ शकेल. अहंकार हा हेतूचा सर्वात मोठा आसरा आहे, शत्रू आहे, रिपू आहे. मग हा अहंकार नष्ट करण्याकरीता मानवाने काय केले पाहिजे? मन सर्वस्व परीने सद्गुरु चरणांवर अर्पण केलेले असेल अशा मानवाला काहीही अवघड नाही. 

मानवावर अनेक प्रकारचे प्रसंग येत असतात. परमेश्वरांनी, अनंतांनी मानवाला शक्ती दिलेली आहे. ही शक्ती सर्वस्व भरून उरलेली आहे. ते नाहीत असे कोणतेही ठिकाण नाही. ज्योत जर सद्गुरु चरणात, सत चरणात लय असेल, तर सद्गुरु त्या ज्योतीला कोणत्याही प्रसंगातून सोडवितात. सद्गुरूंच्या ठिकाणी ज्योतीने सर्वस्व वाहणे आवश्यक आहे. मन बाकी ठेवून जर सद्गुरू चरणांवर बाकीचे अर्पण केलेले असेल, तर त्याचा काय उपयोग आहे? ©️

You cannot copy content of this page