Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

ॐ कार साधना ८

ॐ कार साधना ८

ॐ कार उच्चारण पध्दती – ध्वनी प्रक्रियेचे चार टप्पे – ओम चा उच्चार विशेषत्वाने चार प्रकारे केला जातो. जसे, (अ) वैखरी (ब) मध्यमा (क) पश्यंती (ड) परा हे ध्वनी प्रक्रियेचे चार टप्पे होत.

(अ) वैखरी – यामध्ये मोठ्याने उच्चारण करणे असते. त्यामुळे साधकाचे मन आवाजावर एकाग्र होण्यास मदत होते. मनाला नामजपाची सवय लागेपर्यंत साधनेच्या पहिल्या टप्प्यात त्याचा खूप उपयोग होतो. या पद्धतीलाच वैखरी म्हणतात.

(ब) मध्यमा – नामजपाची दुसरी अवस्था म्हणजे मध्यमा होय. येथे मंत्राचा उच्चार ऐकू येत नाही. फक्त ओठ हलतात. शब्द आणि अशब्द यांच्यातील स्थानाला मध्यमा म्हटले जाते. वैखरीमध्ये तोंडातून आवाज बाहेर पडतो, तर मध्यमामध्ये तो घशातून बाहेर पडतो, पण ओठातून जात नाही.

(क) पश्यंती – या पद्धतीमध्ये मंत्राचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जप केला जात नाही. तो मनामध्ये चालू असतो. या मानसिक नामजपात उच्चारासाठी कोणताही प्रयत्न करण्याची आवश्यकता नसते. या ध्वनीरहित नाम पद्धतीला पश्यंती वाणी म्हटले जाते.

(ड) परा – या चौथ्या अवस्थेत साधक देखील मंत्र विसरतो. यावेळेस मंत्राचा प्रभाव त्याच्या चेतनेवर राहतो. हीच ती परा स्थिती होय. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे ही आत्मसाक्षात्कार किंवा आत्मज्ञानाची अवस्था होय. यालाच तुर्या अवस्था देखील म्हटले जाते.

ॐ उच्चारणाचे अनेक प्रकार – (१) ५०% ओ चे उच्चारण व ५०% म चे उच्चारण हा पहिला प्रकार. (२) ७५% ओ चे उच्चारण व २५% म चे उच्चारण हा दुसरा प्रकार. (३) २५% ओ चा उच्चार व ७५% म चा उच्चार हा तिसरा प्रकार. (४) योगाभ्यासात ओम चे उच्चारण अ – ऊ – म ह्या पध्दतीने करावे असे म्हटले जाते. (पुढे सुरु….९)

You cannot copy content of this page