Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

मने अजून गढूळ का? ©️

मने अजून गढूळ का? ©️

श्री समर्थ मालिक – प्रवचनपरांचे वचन, त्यांचे बोल ! ते ऐकण्याची इच्छा म्हणा. सेवेकऱ्यांची महान इच्छा असते प्रवचन ऐकण्याची, पण त्याप्रमाणे कोणी सेवेकरी चालले आहेत का? आदेश मानले आहेत का? मनात रुजू करून घेतले आहेत का?

सत् हे कोणाकडून काय करून घेईल हे सांगता येणार नाही. मग तुम्हाला सांगून ते करून घेईल का? सेवेकऱ्यांच्या मनात शंका कुशंका का?

या दरबारात काय चालते हे मी पूर्णत्वाने जाणतो. सेवेकर्‍यांची मने शुद्ध किती आहेत हे पण जाणतो. यात सद्गुरूंचा दोष नाही. सेवेकरी आपल्या कृतीचे फळ आपल्या ओटीत घेतो. सेवेकरी फसतो तो कशामुळे फसतो? काय कारणाने वाहत जातो? तर मनात शंका आणतो, म्हणून फसला जातो. त्यात सताचा काय दोष आहे?

अनेक वेळेला सांगितले, मला आदी अंत काही नाही. ॐ कारांचा कोणीतरी अंत घेतला आहे का? जे अखंड तत्व बहाल केले आहे, त्यात किती सेवेकरी रममाण झाले आहेत? एक एक तप झाले तरी, शंका रहित होत नाहीत. शंकेला डावलू शकत नाहीत. मग हा सेवेकरी कसला?

असत कृतीचा खजाना सेवेकरी वाढवू लागला, तर माझा त्यात काही दोष नाही. आसनाधीस्त काही गोष्टी गुप्त ठेवतात, त्या तुम्ही उघड करता. ज्यांनी मस्तकी हस्त ठेवला, त्यांचा शब्द कोणी मानला आहे का? आसनाधीस्त आल्यावर तुम्ही विचारा, तुम्ही ज्योतीला काय सांगत होता? तुम्ही नाही विचारले तर मी विचारतो. एका तत्त्वाचे सेवेकरी, एका सद्गुरूची लेकरे असताना सेवेकऱ्यांची मने अजून गढूळ का आहेत? केव्हा शुद्ध होतील? त्यांचे ते जाणे. (पुढे सुरु…२)

You cannot copy content of this page